Bangladesh Mukti Sangram : भारतीय जवानांमुळे बांगलादेशला स्वातंत्र्य; जाणून घेऊया काय आहे ’मुक्ती संग्राम’?

Bangladesh Mukti Sangram : १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये लाखो महिलांवर बलात्कार, अत्याचार आणि हत्या करण्यात आल्या. सुमारे चार लाख महिलांवर अत्याचार केले गेले. पाकिस्तानपासून वेगळा होण्यासाठी बांगलादेशच्या जनतेने पुष्कळ संघर्ष केला. भारतीय जवानांनी त्यांना हे स्वातंत्र्य मिळवून दिलं.

339
Bangladesh Mukti Sangram : भारतीय जवानांमुळे बांगलादेशला स्वातंत्र्य; जाणून घेऊया काय आहे ’मुक्ती संग्राम’?
Bangladesh Mukti Sangram : भारतीय जवानांमुळे बांगलादेशला स्वातंत्र्य; जाणून घेऊया काय आहे ’मुक्ती संग्राम’?

आज बांगलादेश स्वतंत्र झाला आहे. पूर्वी तो पाकिस्तानचा एक भाग होता. पाकिस्तानपासून वेगळा होण्यासाठी बांगलादेशच्या जनतेने पुष्कळ संघर्ष केला. भारतीय जवानांनी त्यांना हे स्वातंत्र्य मिळवून दिलं. बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध १९७१ मध्ये झाले, त्याला ‘मुक्ती संग्राम’ असेही म्हणतात. (Bangladesh Mukti Sangram)

(हेही वाचा – Sangli Crime News: ५०० रुपयांच्या बनावट नोटा खात्यात भरल्या, सांगली शहर पोलिसांकडून तिघे ताब्यात)

पूर्व पाकिस्तानमध्ये लाखो महिलांवर बलात्कार आणि हत्या

बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानी लष्कराच्या (Pakistan Army) अत्याचाराच्या निषेधार्थ मुक्ती वाहिनीची स्थापना करण्यात आली होती. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करी शासक जनरल अयुब यांच्या विरोधात पूर्व पाकिस्तानातील असंतोष १९६९ मध्ये वाढला आणि १९७० मध्ये बांगलादेशचे संस्थापक नेते शेख मुजीबुर रहमान यांच्या आंदोलनादरम्यान तो शिगेला पोहोचला. मुक्ती वाहिनी (bangladesh mukti bahini) ही पाकिस्तानी लष्कराविरुद्ध गनिमी कावा पद्धतीने लढणारी संघटना होती. मुक्ती वाहिनीला भारतीय लष्कराने पाठिंबा दिला होता.

१९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये लाखो महिलांवर बलात्कार, अत्याचार आणि हत्या करण्यात आल्या. सुमारे चार लाख महिलांवर अत्याचार केले गेले. महिलांशी जबरदस्ती शारीरिक संबंध, महिलांना लष्करी छावणीत सेक्स वर्कर म्हणून ठेवणे आणि सामूहिक बलात्कार असे अत्याचार करण्यात आले. विशेषतः हिंदू महिलांना टार्गेट करण्यात आले होते.

(हेही वाचा – Maharashtra Legislative Session: सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं)

८० लाख लोकांचा भारतीय हद्दीत प्रवेश

लढाईच्या पहिल्या दिवसापासून ढाका (Dhaka) येथील डिंगी मिलिटरी कॅन्टमध्ये ५६३ बंगाली महिलांना कैद करण्यात आले. पाकिस्तानी लष्कराचे सैनिक या महिलांवर अत्याचार करत असत. अत्याचारांना कंटाळून सुमारे १ दशलक्ष लोकांनी भारतात स्थलांतर केले. पूर्व पाकिस्तानमधील अत्याचारांना कंटाळून सुमारे ८० लाख लोकांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला.

१९७१ पूर्वी बांगलादेश (Bangladesh) हा ‘पूर्व पाकिस्तान’ नावाने ओळखला जायचा. तर सध्याच्या पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तान म्हटले जात होते. अनेक वर्षांचा संघर्ष आणि पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार आणि बंगाली भाषिकांच्या दडपशाहीच्या निषेधार्थ पूर्व पाकिस्तानातील जनता रस्त्यावर उतरली होती. १९७१ मध्ये स्वातंत्र्याची चळवळ चिरडण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने बंडखोरी करणाऱ्या पूर्व पाकिस्तानातील जनतेवर अमानुष अत्याचार केले.

(हेही वाचा – Payment Gateway Scam : पेमेंट गेटवे घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा)

मग भारताने यात हस्तक्षेप केला. त्याचा परिणाम असा झाला की भारत आणि पाकिस्तानमध्ये (Indo-Pakistani War of 1971) थेट युद्ध झाले. हे युद्ध २५ मार्च ते १६ डिसेंबर १९७१ पर्यंत चालले. या रक्तरंजित युद्धातून बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाले. बांगलादेशची स्थापना १६ डिसेंबर १९७१ रोजी झाली. पाकिस्तानवर भारताचा हा ऐतिहासिक विजय ’विजय दिवस’ (Vijay Diwas) किंवा ’बिजोय दिबोस’ म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानवरील हा विजय अनेक अर्थांनी ऐतिहासिक होता. भारताने ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना गुडघे टेकण्यास भाग पाडले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.