फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्याला उपस्थित राहण्याच्या एक दिवस आधी २५ जानेवारी रोजी दिल्ली ला न जाता जयपूरला पोहोचले. २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ७५ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ओमेर किल्ल्यावर त्यांचे राजस्थानी शैलीत स्वागत करण्यात आले. (Emmanuel Macron in India)
भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, मॅक्रॉन यापूर्वी मार्च २०१८ मध्ये राजकीय दौऱ्यावर आणि सप्टेंबर २०२३ मध्ये दिल्ली जी-20 शिखर परिषदेसाठी अधिकृत दौऱ्यावर भारतात आले होते.याशिवाय त्यांनी पंतप्रधान मोदींचे फ्रान्समध्ये चार वेळा स्वागत केले आहे.
#WATCH | Rajasthan: Prime Minister Narendra Modi gifts a replica of Ram Mandir to French President Emmanuel Macron, in Jaipur. pic.twitter.com/l9K91lOOt8
— ANI (@ANI) January 25, 2024
(हेही वाचा : BMC : मुंबई महापालिकेला टाळे लावण्याची आली वेळ!)
यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत, स्टीफन सेजोर्न (युरोप आणि परराष्ट्र व्यवहार) सेबॅस्टियन लेकोर्नू (सशस्त्र दल) आणि राचिडा दाती (संस्कृती) यांचा समावेश असलेले मंत्रिस्तरीय शिष्टमंडळ, फ्रेंच मेजर, एसएमई आणि मिड-कॅप्सचे सी-स्तरीय व्यावसायिक शिष्टमंडळ आणि ईएसए अंतराळवीर थॉमस पेसक्वेट यांच्यासह इतर प्रतिष्ठित व्यक्ती होत्या.
हेही पहा –