फ्रेंचमधले रोमँटिक धाटणीचे लेखक आणि राजकीय नेते Hector Hugo

352
व्हिक्टर ह्यूगो (Hector Hugo) यांना ओशन मॅन या नावानेही ओळखलं जातं. ते फ्रेंचमधले रोमँटिक धाटणीचे लेखक आणि राजकीय नेते होते. त्यांनी आपली कारकीर्द साठ वर्षांपेक्षा जास्त काळ गाजवली. आपल्या करकिर्दीदरम्यान त्यांनी वेगवेगळ्या धाटणीचं लिखाणही केलं.
व्हिक्टर ह्यूगो (Hector Hugo) यांचा जन्म २६ फेब्रुवारी १८०२ साली ईस्टर्न फ्रांस येथे झाला. व्हिक्टर ह्यूगो यांचे वडील नेपोलियनच्या सैन्यामध्ये जनरल या पदावर होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या पोस्टिंगनुसार घरं बदलावी लागत असत. १८१५ साली व्हिक्टर ह्यूगो यांचे आईवडील विभक्त झाल्यानंतर व्हिक्टर ह्यूगो यांची आई पॅरिस येथे गेली आणि त्यांना त्यांच्या वडिलांनी प्रायव्हेट बोर्डिंग स्कुलमध्ये ठेवलं. त्या बोर्डिंग स्कुलमध्ये ते तीन वर्षे राहिले. त्यांचा अभ्यासही तिथे सुरू होता.
१८१७ साली व्हिक्टर ह्यूगो (Hector Hugo)  यांनी अकॅडमी फ्रॅंकेजने आयोजित केलेल्या एका स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांनी एक कविता लिहिली होती. त्यावेळी व्हिक्टर ह्यूगो हे फक्त पंधरा वर्षांचे होते. त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या त्या कवितेसाठी त्यांचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. त्याच वर्षी व्हिक्टर ह्यूगो हे आपल्या आईसोबत राहायला लागले होते. तेव्हा त्यांनी वकिलीचा अभ्यास करायलाही सुरुवात केली होती.
१८१९ साली व्हिक्टर ह्यूगो यांनी आपल्या भावासोबत एक मॅगझीन प्रकाशित केलं होतं. त्यानंतर १८२३ साली त्यांनी आपलं पाहिलं कवितेचं पुस्तक प्रकाशित केलं. हे पुस्तक मार्केटमध्ये खूप गाजलं. त्यांनंतर त्यांनी १८२६ आणि १८२९ साली त्या कवितेच्या पुस्तकाचे आणखी पाच खंड प्रकाशित केले. त्या कालखंडात व्हिक्टर ह्यूगो हे तत्कालीन सर्वोत्कृष्ट कवींपैकी एक बनले होते. पण त्यानंतर ते राजकारणात गुंतले गेले. त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे त्यांना त्यांच्या कवी, लेखक या करकीर्दीतून हद्दपार करण्यात आलं. पुढे कालांतराने २२ मे १८८५ साली त्यांचे निधन झालं.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.