भारत सरकारद्वारे उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार म्हणजे ‘भारतरत्न’ पुरस्कार आहे. त्यानंतर अनुक्रमे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आहेत. आधी हा पुरस्कार खेळ क्षेत्रात दिला जात नव्हता. पण नंतर तो खेळ क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात आला. सचिन तेंडुलकर एकमेव असा खेळाडू आहे की ज्याला खेळ क्षेत्रात योगदानाबद्दल ‘भारतरत्न’ देण्यात आला. कमी वयात भारतरत्न प्राप्त करणाराही तोच एकमेव व्यक्ती आहे. त्यानंतर प्रभावी राजकीय कामगिरीसाठी ‘श्री अटल बिहारी वाजपेयी’ यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
‘भारतरत्न’ पुरस्कार आपल्या देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो. या सेवांमध्ये कला, विज्ञान, साहित्य, खेळ आणि सार्वजनिक सेवांचा समावेश आहे. या पुरस्काराची सुरुवात 2 जानेवारी 1954 रोजी भारताचे त्यावेळीचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या द्वारे करण्यात आली होती. सुरुवातीला हा पुरस्कार मृत्यूनंतर देण्याची प्रथा नव्हती. ती प्रथा 1955 नंतर सुरू करण्यात आली. त्यानंतर 14 लोकांना भारतरत्न पुरस्कार मृत्यूनंतर देण्यात आले. एक वर्षात फक्त तीनच व्यक्तींना हा पुरस्कार देता येतो.
( हेही वाचा: कोरोनाचा मंत्र्यांना विळखा! मागील आठवडाभरात किती मंत्र्यांना झाली लागण? )
महाराष्ट्रातील या महान व्यक्तींना दिला भारतरत्न पुरस्कार
- भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले महाराष्ट्रीय व्यक्तीमत्त्व म्हणजे, महर्षी धोंडो केशव कर्वे. 29 ऑक्टोबर 1958 रोजी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
- महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांना 1963 साली भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक विनायक नरहरी भावे अर्थात विनोबा भावे यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि थोर समाजसुधारक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
- जे आर डी टाटा यांना 1992 साली भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.
- आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणा-या गायनसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 2001 मध्ये सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- पंडित भीमसेन जोशी यांना 2008 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
- क्रिकेटचा देव म्हणून जगात ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरला 2014 मध्ये भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.