७३ वर्षांपासून देशातील २५ गावांकरता चालवली जाते मोफत रेल्वे

देशातील कानाकोपऱ्यात रेल्वे पोहचली आहे. अत्यंत डोंगराळ भागातूनही रेल्वे रूळ टाकून अत्यंत दुर्गम भागातील गावांना मुख्य शहरांशी जोडण्याची किमया भारतीय रेल्वेने साध्य केली आहे. मात्र अशा एका मोठ्या प्रकल्पासाठी जमीन दिल्यामुळे रेल्वेने देशातील २३ गावांतील गावकऱ्यांसाठी तब्बल ७३ वर्षांपासून मोफत रेल्वे सुरू आहे.

ट्रेन १३ किमी अंतर चालवली जाते

भाकरा नांगल धरणाला जमीन दिल्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांसाठी भारतीय रेल्वेने मोफत रेल्वे सुरु केली. पंजाब आणि हिमाचल या दरम्यान भाकरा आणि नांगल या दोन ठिकाणांच्या दरम्यान ही ट्रेन सुरु करण्यात आली. ही ट्रेन १३ किमी अंतर चालवली जाते. शिवालिक टेकडीवरून ही ट्रेन चालवली जात असल्याने डोंगराळ भागातील रहिवाशांना याचा फायदा होत आहे. ही ट्रेन नेहल स्थानकाहून पुढे पंजाबमधील नांगल धरणापर्यंत जाते. ही ट्रेन चालवण्यासाठी प्रत्येक तासासाठी १८ ते २० लिटर डिझेलचा उपयोग करावा लागतो. भाकरा बीस मॅनेजमेंट बोर्डने भाकरा नांगल धरणासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी मोफत रेल्वे सुरु केली. या रेल्वेचा सगळा खर्च बोर्ड करते.

(हेही वाचा बहुसदस्यीय प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली)

३०० रहिवाशांना या ट्रेनचा फायदा होत आहे

आता आर्थिक अडचणीमुळे बोर्डाला ही ट्रेन मोफत सुरु ठेवता येत नाही. परंतु भाकर नांगल धरण हे पुरातन आणि सांस्कृतिक क्षेत्र म्हणून या ठिकाणी मोफत ट्रेन सुरु राहील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. भाकरा आणि नांगल येथील २५ गावांतील तब्बल ३०० रहिवाशांना या मोफत ट्रेनचा फायदा होत आहे. या ट्रेनचा कामगार आणि विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here