Records : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये भारतातील आजवरच्या पराक्रमांचे संकलन

94
Records : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये भारतातील आजवरच्या पराक्रमांचे संकलन
भारत ७८वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना प्रतिभा, चिकाटी आणि अमर्याद महत्त्वाकांक्षेने शिगोशिग भरलेल्या एका देशाच्या उल्लेखनीय वाटचालीचा वेध आपण लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसच्या साथीने घेऊ शकतो. विविध क्षेत्रांतील भारताच्या प्रगतीचा लिखित दस्तऐवज म्हणून आपली भूमिका निभावणारा, गौरवास्पद विक्रमांच्या नोंदींचा हा संच केवळ यशाच्या नव्या शिखरांवर पोहोचलेल्या व्यक्तींची कामगिरी प्रदर्शित करत नाही, तर शक्यतेच्या मर्यादांना पुन्हा-पुन्हा विस्तारणाऱ्यांचे यशही सर्वांसमोर आणतो. भारताचे पहिलेवहिले रेकॉर्ड बुक म्हणून निर्माण केलेल्या स्वतंत्र वारशाशी इमान राखून असलेल्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसची ३३वी आवृत्ती सुरू असून यात दाखल झालेल्या असाधारण कर्तृत्वांचा संग्रह वाचकांच्या मनावर छाप पाडल्याखेरीज राहत नाही. (Records)
उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत; देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून येणाऱ्या यशवंतांच्या कामगिरीने हे मोझॅक चित्र पूर्ण करण्यामध्ये आपले योगदान दिले आहे आणि सर्वोत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यासाठी व अद्वितीय यश साजरे करण्यासाठी एकजूट झालेल्या देशाचे एक अनेकरंगी चित्र साकारले आहे. पुस्तकाच्या ताज्या आवृत्तीमध्ये नोंदविल्या गेलेल्या आणि आपल्या देशाच्या दुर्दम्य ऊर्मीला अधोरेखित करणाऱ्या सर्वाधिक अलौकीक अशा कामगिरीचा धांडोळा घेण्यासाठी आमच्याबरोबर सामील व्हा.
1. क्रीडाक्षेत्रातील चमकते सितारे 
भारतीय क्रीडापटूंच्या निधड्या वृत्तीने, अढळ समर्पित भावाने व विलक्षण कामगिरीने अवघे क्रीडाविश्व निनादून जात आहे! पुढील विक्रम म्हणजे त्यांच्या निग्रही व्यक्तिमत्त्वाचे मूर्तीमंत उदाहरणे आहेत :
• एकाच क्रिकेट वर्ल्ड कप पर्वामध्ये सर्वाधिक धावा
२०२३ मध्ये विराट कोहली हा ७६५ धावा काढून एकाच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम करणारा धावपटू ठरला, हे करताना त्याने ६७३ धावा काढण्याचा सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडला.
• आशियाई खेळांमध्ये मिश्र दुहेरीचे सुवर्ण पदक जिंकणारी पहिली जोडी
दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग संधू एशियन गेम्स २०२२ मध्ये मिश्र दुहेरी सामन्यातील सुवर्ण पदक जिंकणारी पहिली जोडी ठरली.
• साहस (पश्चिम प्रांत) : ओशियन्स सेव्हन आव्हान पूर्ण करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू
नवी मुंबई, महाराष्ट्र इथला प्रभात कोळी (जन्म २७ जुलै १९९९)  हा २३ वर्षांचा तरुण १ मार्च २०२३ रोजी ओशियन्स सेव्हन आव्हान पूर्ण करणारा जगातील सर्वात तरुण व्यक्ती बनला. खराब हवामानाचा सामना करत त्याने न्यूझीलंडच्या उत्तर आणि पश्चिम बेटांना जोडणारी कुक सामुद्रधुनी ८ तास ४१ मिनिटांत पार केली. या यशाबरोबरच तो तेन्झिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराचाही मानकरी ठरला.
2. ज्ञानाचे राखणदार 
विद्याभ्यासाच्या क्षेत्रामध्ये भारतीय विद्वानांनी आणि संस्थांनी सातत्याने नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. आपल्या देशाला वेगाने पुढे घेऊन जाण्यासाठी जाणारी अखंड ज्ञानसाधना पुढील विक्रमांमधून दिसून येते.
• विद्यापीठाद्वारे एका वर्षामध्ये सर्वाधिक PhD प्रदान केल्या जाण्याचा विक्रम : दिल्ली विद्यापीठाने २५ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडलेल्या आपल्या ९९व्या पदवीदान समारंभामध्ये विक्रमी ९१० PhD पदवी प्रदान केल्या.
• पहिले पंतप्रधान संग्रहालय : नवी दिल्लीतील तीन मूर्ती इस्टेट येथे स्थित प्रधानमंत्री संग्रहालय हे भारताच्या माजी पंतप्रधानांचा गौरव करण्यासाठी समर्पित संग्रहालय आहे. १४ एप्रिल २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७८व्या वर्षपूर्तीच्या औचित्याने या संग्रहालयाचे उद्घाटन केले. या संग्रहालयामधील ४३ दालनांमधून माजी पंतप्रधानांचे जीवन व कार्यकाल मांडण्यात आला आहे. हे संग्रहालय होलोग्राम्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि असे विविध प्रकारचे संवादात्मक अनुभव देऊ करते. संग्रहालयामध्ये माजी पंतप्रधानांच्या नेतवाईकांनी देऊ केलेल्या खासगी वस्तू, भेटवस्तू, स्मृतीचिन्हे आणि पदके तसेच सन्मानार्थ काढण्यात आलेले पोस्टाचे स्टॅम्प्स यांचा समावेश आहे. (Records)
3. कला आणि विज्ञानाच्या क्षेत्रातील मातब्बरी सिद्ध करणारे महानायक  
अलौकिक कलाप्रतिभा आणि वैज्ञानिक नवसंकल्पनांचा उत्फुल्ल मिलाफ घडवून आणणारे ठिकाण अशी भारताची ओळख आहे, जिथून नव्या वाटा निर्माण करणारे यश निर्माण होत असते. त्याचीच काही उदाहरणे पुढीलप्रमाणे :
• एका दिवसात सर्वाधिक रंगमंचीय नाटकांचे प्रयोग – एकपात्री : आकाश भडसावळे (जन्म : ९ फेब्रुवारी १९९६) याने ९ ऑक्टोबर २०२२ रोजी तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रत्येकी ४५ मिनिटांचे एकूण १२ प्रयोग सादर करून परफॉर्मिंग आर्टसप्रती आपली कौतुकास्पद समर्पितवृत्ती दाखवून दिली.
• केवळ अंतराळ निरीक्षणासाठी बनविलेला पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप :
आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्व्हैशनल सायन्सेनस (ARIES), या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत येणाऱ्या स्वायत्त संस्थेला आता केवळ अंतराळ निरीक्षणासाठी तयार करण्यात आलेला पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप बनविण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप (ILMT) म्हणून ओळखली जाणारी ही दुर्बिण आशियातील सर्वात मोठी असून २२ मार्च २०२३ रोजी तिचे उद्घाटन झाले.
• ADITYA-L1 – पहिले सौर संशोधन : ADITYA-L1  हा भारताचा पहिला उपग्रह आहे सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी समर्पित आहे. हा उपग्रह इस्त्रोद्वारे निर्मित देशी बनावटीचा उपग्रह असून २ सप्टेंबर २०२३ रोजी तो अंतराळामध्ये सोडण्यात आला. तो पृथ्वीपासून सुमारे १.५ दशलक्ष किमी दूर राहील, हे अंतर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील अंतराच्या सुमारे १ टक्का इतके आहे.
• पहिली क्लोन्ड गाय : १६ मार्च २०२३ रोजी गंगा ही भारताची पहिली क्लोन्ड गाय जन्माला आली. NDRI, कर्नल, हरयाणा येथील वैज्ञानिकांनी २०१८ साली ‘ओव्हम पिक-अप’ नावाचे नॉन-इन्व्हेजिव्ह तंत्रज्ञान तंत्रज्ञान प्राप्त केल्यानंतर या गायीची निर्मिती केली.
लिम्का बुक ऑप रेकॉर्डसच्या कन्सल्टिंग एडिटर व हॅचेट इंडियाच्या प्रकाशक वत्सला कौल बॅनर्जी म्हणाल्या, ”विविध क्षेत्रांमध्ये विशाल यश मिळविणाऱ्या, भारताच्या यशोगाथेमध्ये मोठ्या सन्मानाची जागा मिळविणाऱ्या यशवंतांना गौरव करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्याचा महिना, ऑगस्टहून अधिक चांगली वेळ असू शकत नाही! अनेक दशकांपासून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् आपल्या देशाची ओळख बनलेल्या यशाच्या ऊर्मीची नोंद ठेवत आहे आणि लोकांना प्रेरणा देत आहे.” (Records)
कोका कोला कंपनीच्या हायड्रेशन, स्पोर्टस् आणि टी कॅटेगरी, इंडियाच्या मार्केटिंग विभागाच्या व साऊथ-वेस्ट एशिया ऑपरेटिंग युनिटच्या सीनिअर डिरेक्टर रुचिरा भट्टाचार्य म्हणाल्या, ”लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसबरोबर कोका-कोलाचा सहयोग म्हणजे भारताच्या झळाळत्या आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा उत्सव आहे. या आयकॉनिक रेकॉर्ड बुकमध्ये नोंदविण्यात आलेल्या मैलाच्या टप्प्याविषयी अंतर्मुख होऊन विचार करताना आपण आपल्या मर्यादांच्या सीमारेषा विस्तारणाऱ्या आणि इतिहास घडविणाऱ्या व्यक्तींच्या विलक्षण कहाण्यांनी प्रेरित आहोत. तसेच आम्‍हाला आनंद होत आहे की या कथांचे डॉक्‍यूमेंटेशन केले जात आहे, ज्‍यामधून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.”
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् अशा अनेक चित्तवेधक यशोगाथांना उजेडात आणते, ज्या अतुल्य भारताला प्रकाशझोतात आणतात. हवाई उड्डाण, खानपान, सिनेमा आणि संगीत अशा विविध क्षेत्रातील विक्रमांची नोंद असणाऱ्या या पुस्तकाच्या २०२४ साली प्रसिद्ध झालेल्या ३३वी आवृत्तीमध्ये हे सर्व काही आणि आणखीही बरेच काही आहे! मग तो ४९ फुटांचा सर्वात लांब कबाब बनविण्याचा अचाट विक्रम असो किंवा एका व्यक्तीने बनविलेला विविध शहरे आणि देशांच्या ३६५ नकाशांचा संग्रह असो, मोठमोठी स्वप्न पाहण्याचे धाडस करणाऱ्या आणि असाध्य ते साध्य करून दाखविणाऱ्या या व्यक्तींची माहिती या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. तेव्हा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् २०२४ ची प्रत https://www.amazon.in/LIMCA-BOOK-RECORDS-Hachette-India/dp/9357318453 येथे आताच मिळवा आणि देशाने प्रत्येक क्षेत्रामध्ये  केलेल्या अनेक पहिल्यावहिल्या आणि महत्त्वपूर्ण मानवी यशाविषयी अधिक जाणून घ्या.  सर्व आघाडीच्या स्टोअर्समध्ये आणि ऑनलाइन उपलब्ध. (Records)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.