रेल्वेचा स्टाफ असल्याचे सांगत, त्याने तब्बल 23 वर्षे केला विनातिकीट प्रवास

आपल्या देशात विनातिकीट प्रवास करणा-यांची संख्या काही कमी नाही. तिकीट तपासणीसाने पकडल्यास अनेक प्रवासी विविध शक्कल लढवताना आपण पाहिले आहे. परंतु एका प्रवाशाने तब्बल 23 वर्षे विनातिकीट प्रवास केला आहे. टीसीने तिकीट विचारल्यास तो रेल्वेचा स्टाफ असल्याचे सांगत असे आणि धक्कादायक बाब म्हणजे ती व्यक्ती रेल्वेचा कंत्राटदार आहे. त्यामुळे या कंत्राटदारानेच रेल्वेला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

तिकीट तपाणीसाला संशय आल्याने त्याने ओळखपत्राची मागणी केली. पटेलने सन 2000 मध्ये बनवलेले ओळखपत्र फाटलेले व खराब झालेल्या स्थितीत होते. त्यामुळे तिकीट तपासणीसची शंका अजून बळावली. त्यांनी ग्रेड पे ची विचारणा केली असता, पटेल उत्तरं देताना सारवासारव करत असल्याचे दिसले. त्यामुळे भरारी पथकातील कुमार शर्मा, भावेश पटेल, अजय सारस्वत यांनी प्रश्नांचा भडिमार केला असता अमित पटेल याने रेल्वेचा कंत्राटदार असल्याचे कबूल केले.

( हेही वाचा: Patra Chawl Case: राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला PMLA कोर्टात सुनावणी )

पोलिसांनी दाखल केला गुन्हा 

अधिक विचारणा केल्यानंतर, पटेल याने कबूल केले की, त्याच्याकडे असणारा पास हा गुजरात जिल्ह्यातील कलोल स्थानकातील कर्मचा-यांचा आहे. या पासच्या आधारे बनावट रेल्वे पास तयार केला आहे. त्यावर शिक्कासुद्धा मारण्यात आला आहे. पटेल यांनी याआधी अनेकदा लोलक, मेल एक्सप्रेसच्या गाड्यातून विनातिकीट प्रवास केल्याचे कबूल केले. याअंतर्गत पोलिसांनी पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here