भारताचा स्वत:चा डिजिटल रुपया आला; आता रोख रक्कम ठेवावी लागणार नाही, ‘हे’ आहेत फायदे

137

मागच्या अनेक महिन्यांपासून आरबीआयच्या डिजिटल करन्सीबाबत चर्चा सुरु आहे. अखेर 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरु करणार आहे. यासाठी एकूण 9 बॅंकांची निवड करण्यात आली आहे. डिजिटल रुपीचा वापर प्रथम मोठ्या पेमेंट आणि सेटलमेंटसाठी केला जाईल. क्रिप्टोकरन्सीची वाढती जोखीम पाहता सरकारने अर्थसंकल्पात डिजिटल चलन आणण्याची घोषणा केली होती.

RBI मंगळवारी 1 नोव्हेंबरला (आज) डिजिटल रुपी लाॅंच करणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदा डिजिटल चलनाचा उल्लेख केला होता. डिजिटल रुपया या आर्थिक वर्षात रोल आऊट केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले होते.

( हेही वाचा: LPG सिलिंडरच्या किंमतीत कपात; ‘अशा’ असतील नव्या किंमती )

डिजिटल रुपीचे फायदे काय?

RBI ने CBDC-W आणि CBDC-R या दोन श्रेणींमध्ये डिजिटल चलनाची विभागणी केली आहे. CBDC-W हे घाऊक चलन म्हणून वापरले जाऊ शकते. तर CBDC-R किरकोळ चलन म्हणून वापरले जाऊ शकते. सर्व खासगी, गैर- आर्थिक ग्राहक आणि व्यवसाय ते वापरण्यास सक्षम असतील. आरबीआयच्या मते, डिजिटल चलनामुळे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था वाढेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.