Women Farmers : शेतांमधून उज्‍ज्‍वल भविष्‍याकडे वाटचाल: महिला शेतकरी करत आहेत नेतृत्‍व

162
Women Farmers : शेतांमधून उज्‍ज्‍वल भविष्‍याकडे वाटचाल: महिला शेतकरी करत आहेत नेतृत्‍व

भारतातील ग्रामीण भागामधील महिलांनी दीर्घकाळापासून कृषीमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, पण त्‍यांच्‍या योगदानांकडे अनेकदा दुर्लक्ष करण्‍यात आले आहे. आज, नाविन्‍यपूर्ण प्रशिक्षण व पाठिंबा उपक्रमांच्‍या माध्‍यमातून महिला शेतकरी (Women Farmers) आर्थिक व सामाजिक अडथळ्यांवर मात करत आहेत, तसेच त्‍यांच्‍या समुदायांचे शाश्‍वत विकासामध्‍ये नेतृत्‍व करत आहेत. महिला किसान दिवस निमित्त, महिला शेतकऱ्यांच्‍या अविरत प्रयत्‍नांना सन्‍मानित व प्रशंसित करूया, ज्‍या अडथळ्यांवर मात करत कृषीमधील परिवर्तनाचे नेतृत्‍व करत आहेत. या पाच प्रेरणादायी महिलांनी त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यासोबत त्‍यांच्‍या अवतीभोवती असलेल्‍यांना देखील सक्षम केले आहे, ज्‍यामुळे सकारात्‍मक बदलाचा प्रभाव निर्माण झाला आहे. त्‍यांच्‍या गाथांमधून स्थिरता व समुदायाची परिवर्तनात्‍मक क्षमता, तसेच दीर्घकालीन प्रभाव दिसून येतो, जो महिलांनी यशस्‍वी होण्‍यासाठी सक्षम केल्‍यास संपादित करता येऊ शकतो. कोका-कोला इंडिया फाऊंडेशन आनंदनचे पाठबळ असलेली कोका-कोला इंडियाची #SheTheDifference मोहिम या उत्‍साहाला पाठिंबा देते, तसेच महिलांना त्‍यांच्‍या समुदायांमध्‍ये अर्थपूर्ण परिवर्तनाचे नेतृत्‍व करण्‍यास सक्षम करत आहे.

(हेही वाचा – Axis Bank ने पहिला क्रमांक पटकावत डिजीटल पेमेंटमधील स्थान केले मजबूत)

New Project 2024 10 14T133244.368

पी. रेजिना : तामिळनाडूमधील समुदायाच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला

तामिळनाडूमधील थेनी जिल्‍ह्यातील ६२ वर्षीय पी. रेजिना त्‍यांच्‍या समुदायामध्‍ये सक्षमीकरण चळवळीचे नेतृत्‍व करत आहेत. १२ महिलांनी स्‍थापित केलेला बचत गट ‘वहिन’च्‍या प्रमुख म्‍हणून त्‍यांनी कॅरोट माल्‍ट, बीटरूट माल्‍ट आणि आमला कँडी अशा वनस्‍पती-आधारित, सेंद्रिय उत्‍पादनांची निर्मिती करत जीवनामध्‍ये बदल घडवून आणला आहे. रेजिना यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत ग्रुपचे एकूण मासिक उत्‍पन्‍न आता ३०,००० रूपये आहे, ज्‍यामुळे त्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्‍यासोबत समान स्‍वप्‍नं व एकमेकींचा पाठिंबा असलेले प्रबळ बहीणभाव देखील निर्माण होत आहे. (Women Farmers)

(हेही वाचा – Sahitya Samelan : साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातून सुमारे दोन ते अडीच हजार नागरिक येण्याची अपेक्षा)

New Project 2024 10 14T133323.617

राणी एचपी : कूर्गमधील कॉफी शेतकरीची स्थिरता

कोडागूमधील हेरावनाडूच्‍या शाही वारसामध्‍ये खोलवर रूजलेला राणी एचपी यांच्‍या जीवनप्रवासामधून स्थिरता व परिवर्तन दिसून येते. पतीच्‍या निधनानंतर त्‍यांनी दोन दशक मेहनत घेत ओसाड जमिनीला संपन्‍न कॉफी मळ्यामध्‍ये बदलले. त्‍यांना त्‍यांच्‍या अथक मेहनतीचे फळ मिळाले, जेथे त्‍या त्‍यांच्‍या कॉफी मळ्यामधून स्थिर व आदरणीय उत्‍पन्‍न मिळवत आहेत. स्‍थानिक एनजीओंनी दिलेला पाठिंबा आणि आनंदन – कोका-कोला इंडिया फाऊंडेशनने शाश्‍वत कृषी पद्धतींबाबत दिलेल्‍या प्रशिक्षण उपक्रमांमुळे राणी यांच्‍या यशाला अधिक हातभार मिळाला. या उपक्रमांमुळे त्‍यांना कृषी तंत्रे अधिक निपुण करण्‍यास मदत झाली. त्‍यांचे नेतृत्‍व आणि समर्पिततेला ओळखत कूर्गमधील ईश्‍वर (ISWAR) यांचा उपक्रम मादिकेरी हायलँड्स फार्मर्स प्रॉड्युसर्स कंपनी लिमिटेड (एफपीओ) साठी त्‍यांची बोर्ड संचालक म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली. (Women Farmers)

(हेही वाचा – Rahul Dravid : रोहित, विराटबरोबर राहुल द्रविडचा सराव)

New Project 2024 10 14T133432.719

सुवर्णा : गांडूळखताच्‍या मदतीने पालापाचोल्‍यामधून साध्‍य केली संपत्ती

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामधील गोंडोली गावातील अल्पभूधारक शेतकरी सुवर्णा यांनी त्‍यांच्‍या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि रासायनिक खतांवरील अवलंब कमी करण्यासाठी गांडूळखताचा वापर केला. तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्‍यांनी एका बेडमधून ४५० किलो गांडूळखत यशस्वीरित्या तयार केले, ज्यामुळे त्‍यांची ऊस पिके आणि भाजीपाल्याच्या बागेत लक्षणीय वाढ झाली. या सोप्या, पण प्रबळ पद्धतीने त्‍यांच्‍या कुटुंबाला आर्थिक साह्य मिळवून देण्‍यासोबत पौष्टिक फायदे देखील दिले आहेत, ज्‍यामुळे त्‍या स्‍वत:चे उत्‍पादन वाढवण्‍यासोबत उदरनिर्वाह करण्‍यास सक्षम झाल्‍या आहेत. २०२२ मध्‍ये सुरू झालेल्‍या त्‍यांच्‍या या प्रवासामध्‍ये मोठा बदल झाला आहे, जेथे सुवर्णा आता संपन्‍न शेतकरी-उद्योजक बनल्‍या आहेत. (Women Farmers)

(हेही वाचा – महायुती सरकारच्या सर्व योजना ‘पर्मनंट’ सुरू राहतील; CM Eknath Shinde यांची ग्वाही)

New Project 2024 10 14T133517.144

प्रीती कृष्‍णा कुमार : यशस्‍वी कृषीच्‍या दिशेने तरूण आईचा प्रवास

थेनीमधील प्रीती कृष्‍णा कुमार यांना वयाच्‍या अवघ्‍या २४व्‍या वर्षी मातृत्‍वाच्‍या जबाबदाऱ्या आणि मर्यादित संसाधने असलेल्‍या शेतीमध्‍ये संतु‍लन राखावे लागले. फलोत्‍पादनावर केंद्रित महिला सक्षमीकरण उपक्रमामध्‍ये सामील झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या जीवनाला परिवर्तनात्‍मक कलाटणी मिळाली. तीन वर्ष आणि जवळपास ५० प्रशिक्षण सत्रांसह प्रीती यांनी द्राक्षे व मिरचीची लागवड करण्‍यास सुरूवात केली, तसेच केळी पावडर, ग्रेप स्‍क्‍वॅश आणि मिलेट स्‍नॅक्‍स अशी मूल्‍यवर्धित उत्‍पादने देखील विकसित केली. या उद्यमामुळे त्‍यांच्‍या वार्षिक उत्‍पन्‍नामध्‍ये ५३ टक्‍क्‍यांची वाढ झाली आणि आता त्‍यांची मासिक कमाई १०,००० रूपये आहे. शेतकरी व उद्योजक म्‍हणून त्‍यांच्‍या या स्‍वावलंबीपणाने त्‍यांच्‍या जीवनात नवीन उद्देश जागृत केला आणि त्‍यांना आपल्‍या कुटुंबाच्‍या भविष्‍याप्रती योगदान देण्‍याचा अभिमान वाटतो. (Women Farmers)

(हेही वाचा – CM Eknath Shinde: शिंदे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत १९ मोठे निर्णय!)

New Project 2024 10 14T133610.976

बसंती : उत्तराखंडच्‍या सफरचंद बागांमध्‍ये भरभराट

उत्तराखंडच्या डोंगराळ प्रदेशातील बसंती यांच्‍या जीवनगाथेमधून आधुनिक कृषी तंत्र आणि धोरणात्मक पाठिंब्‍याची परिवर्तनीय क्षमता दिसून येते. कोका-कोला इंडिया फाऊंडेशन आनंदनचा प्रोजेक्‍ट उन्‍नती अॅप्‍पलच्‍या हस्‍तक्षेपाच्‍या माध्‍यमातून त्‍यांना ठिबक सिंचन आणि सेंद्रिय पद्धतींची ओळख झाली, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या सफरचंद उत्‍पादनात लक्षणीय वाढ झाली. पूर्वी त्‍या बटाट्याच्‍या शेतीमधून प्रतिहंगाम फक्‍त २०,००० रूपये उत्‍पन्‍न मिळवत होत्‍या, पण आता बसंती यांना त्‍यांच्‍या सफरचंद बागांमधून जवळपास ३ लाख रूपये उत्‍पन्‍न मिळण्‍याची अपेक्षा आहे. या यशामुळे त्‍यांच्‍या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली असून शेतावर होमस्‍टे निर्माण करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या दृष्टिकोनाला चालना देखील मिळाली आहे. (Women Farmers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.