आरोग्य विभागापेक्षा बूस्टरसाठी ‘या’ विभागाचे कर्मचारी आहेत आघाडीवर!

98

मुंबईमध्ये सोमवारपासून दोन लस घेतलेल्या नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक लस अर्थात बूस्टर डोस दिला जात असून, तिसऱ्या दिवशी एकूण बूस्टर लस घेतलेल्यांची संख्या ४० हजार ३६४ एवढी झाली आहे. दिवसभरात आरोग्य विभागाच्या ४ हजार ५५९ कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस घेतला. तर फ्रंटलाईन वर्करपैकी ७ हजार ६८२ कर्मचाऱ्यांनी बुस्टर डोस घेतला आणि ६० वर्षांवरील २ हजार ६५५ नागरिकांनी ही लस घेतली आहे. त्यामुळे दिवसभरात १४ हजार ८९६ कर्मचारी व नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.

आतापर्यंत दोन लस घेतलेल्या आणि दोन्ही डोस घेतल्यांना ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असतील, अशा आरोग्य विभागातील कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर, तसेच ६० वर्षांवरील नागरिकांसाठी १० जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जात आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी १० हजार कर्मचारी व नागरिकांनी बूस्टर डोस घेतला होता, तर मंगळवारी १५ हजार १२७ कर्मचारी व नागरिकांनी बूस्टर डोस घेतला होता. त्यामुळे तीन दिवसांमध्ये एकूण ४० हजार ३६४ जणांनी बूस्टर घेतला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये फ्रंटलाईन वर्कर बूस्टरसाठी पुढे दिसत नसला, तरी आता मोठ्या प्रमाणात या प्रतिबंधात्मक लससाठी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

( हेही वाचा : रुग्ण वाढीचा पारा पुन्हा वर चढला… )

१२ जानेवारी २०२२

  • आरोग्य विभाग : ४ हजार ५५९ कर्मचारी
  • फ्रंटलाईन वर्कर : ७ हजार ६८२ कर्मचारी
  • ६० वर्षांवरील नागरीक : २ हजार ६५५ नागरीक

११ जानेवारी २०२२

  • आरोग्य विभाग : ५ हजार २४९ कर्मचारी
  • फ्रंटलाईन वर्कर : १ हजार ८२३ कर्मचारी
  • ६० वर्षांवरील नागरीक : २ हजार ८९३ नागरीक

१० जानेवारी २०२२

  • आरोग्य विभाग : ५ हजार २४९ कर्मचारी
  • फ्रंटलाईन वर्कर : १ हजार २२३कर्मचारी
  • ६० वर्षांवरील नागरीक : ३ हजार ६२६ नागरीक
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.