यमुना नदीवर विषारी फेसाचा तरंग!… जाणून घ्या कारण

दिल्लीत वायू प्रदूषणासोबत जल प्रदूषणाची समस्यादेखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यमुनेच्या पाण्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने विषारी फेसाचा तरंग या नदीत तयार होतो. छठपूजेचे धार्मिकविधी करण्यासाठी स्त्रिया दरवर्षी अशा विषारी पाण्यात पूजा करतात. या नदीतील प्रदूषणाचे प्रमाण सुमारे ८० टक्के आहे. तरीही, आजतागायत या समस्येवर तोडगा निघालेला नाही.

विषारी फेसामागचे कारण काय ?

तज्ज्ञांच्या मते, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडले जाते. कारखाने, रंगरंगोटी उद्योग, धोबी घाट आणि घरांमध्ये वापरल्या जाणार्‍या डिटर्जंट्समुळे फॉस्फेट आणि सफॅक्टंट हे दोन घटक यमुनेच्या पाण्यात तयार होतात. हे घटक विषारी फेस तयार होण्याचे मुख्य कारण आहेत. जेव्हा सेंद्रिय पदार्थ विघटित होतात तेव्हा फोम फुगे तयार होतात. हे फोमचे बुडबुडे पाण्यापेक्षा हलके असतात, म्हणून ते पृष्ठभागावर तरंगतात. तसेच, उत्तर प्रदेशातील साखर आणि कागद उद्योगांच्या प्रदूषणामुळेही यमुनेचे प्रदूषण होते.

(हेही वाचा -अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, ९ जण बचावले, रूग्णालयात उपचार सुरू)

रोगराई पसरण्याचा धोका

विषारी पांढर्‍या फेसामुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढतो. अशा लोकांना सर्वाधिक धोका असतो जे यमुनेचे पाणी स्नानासाठी वापरतात. या पाण्यामुळे त्वचेची जळजळ आणि अॅलर्जी होऊ शकते. या रसायनांचे सेवन केल्यास गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आणि टायफॉइडसारखे आजार होऊ शकतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here