Russia Ukraine War: युद्धाने भारतीयाचं जगणं केलं मुश्कील!

102

रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणावर देखील दिसून आले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराने सात वर्षातील उच्चांक मोडला असून कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 110 डॉलर इतके झाले आहेत. त्यामुळे हे युद्ध भारतीयाचं जगणं मुश्कील करणार असल्याचे संकेत दिसत आहेत. येत्या काही दिवसात कच्चे तेल आणखी महागणार असल्याचा पेट्रोल-डिझेलचे दर देखील भडकणार आहे.

युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर कडाडले

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर कडाडले आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल $110 वर पोहोचले आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने (IEA) जगात ऊर्जा संकट वाढण्याचा इशारा दिला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी येण्याची भीती तज्ज्ञांनी आधीच व्यक्त केली होती. बुधवारी सकाळी, ब्रेंट क्रूडच्या किमती 5 टक्क्यांहून अधिक वाढल्या आणि प्रति बॅरल $110.54 वर पोहोचल्या आहेत.

महागाईच्या संकटाची चाहूल?

क्रूड ऑईल उत्पादक देशांमध्ये रशिया हा प्रमुख देश आहे, मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युरोपला मागणीच्या एकूण 35 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा रशियाकडून होतो. भारतदेखील रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो. कच्च्या तेलाचा पुरवठा खंडीत झाल्यास येणाऱ्या काही दिवसात दर आणखी भडकण्याची शक्यता असून महागाईच्या संकटाची चाहूल लागल्याचे दिसतेय.

(हेही वाचा – तारीख पे तारीख! ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लटकली)

असे सांगितले जात आहे की, कच्च्या तेलाच्या दरात 1 डॉलरची दरवाढ झाल्यास इंधन कंपन्यांकडून प्रतिलिटर 40 पैसे  इतकी दरवाढ केली जाते. एक डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 68 डॉलर इतका होता. त्यानंतर आता 110 डॉलर प्रति बॅरल इतका दर झाला आहे. जवळपास तीन महिन्यांपासून इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे इंधन कंपन्यांना नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या दरात किमान 16 रुपयांची वाढ करावी लागू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.