लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील हणमंतवाडीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील १५ ते २० वर्षांपासून हणमंतवाडीत स्मशानभूमीच्या जागेची मागणी होत आहे. मात्र गावकऱ्यांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्य़ा मागणीवर प्रशासनाकडून कोणतीही पाऊलं उचलली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गावातील मृत महिलेवर ग्रामपंचायतीसमोरत अंत्यसंस्कार केले. हा प्रकार गुरूवारी घडला आहे.
गावकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाचा कानाडोळा
हणमंतवाडीतील ग्रामस्थ गेल्या २० वर्षापासून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून वारंवार मागणी प्रशासनाकडे करत आहे. मात्र अद्याप गावकऱ्यांचा स्मशानभूमीचा प्रश्न संपुष्टात आला नाही. येथील जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने गावातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे, असा प्रश्न आहे.
म्हणून घेतला ग्रामस्थांनी निर्णय
वयवर्ष ७० असलेले सोजरबाई रामचंद्र निकम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर थेट ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. ठरल्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयासमोर चिता रचून पेटविली आणि तिथेच अंत्यविधी केले. या गावचे सरपंच प्रभाकर मलिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मशानभूमीसाठी चार गुंठे जागा गावाने खरेदी केली होती. परंतु संबंधित शेतमालकाने ती जागा गावातील एकास विकली. त्यामुळे जागा देणारा आणि जागा खरेदी करणारा हे दोघेही जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने न्ययालयात धाव घेतली. ग्रामपंचायतीने स्मशानभूमी तयार करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र प्रशासन जागा देत नाही.
Join Our WhatsApp Community