जी. एस. शिवरुद्रप्पा यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९२६ रोजी कर्नाटकातील शिवमोग्गा (Shivamogga) जिल्ह्यातील शिकारीपुरा तालुक्यातील इसूर गावात झाला.
त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. शिवरुद्रप्पा (G.S. Shivrudrappa) यांनी त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिकारीपुरा येथे पूर्ण केले. शिवरुद्रप्पा यांनी १९४९ साली बी.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी एम.ए.च्या पदवीसाठी पुढचे शिक्षण शिरू ठेवले.
(हेही वाचा – Creative Academy : विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रिएटिव्ह अकॅडमीवर चालवणार बुलडोझर; आमदार महेश लांडगे यांची चेतावणी)
“सौंदर्य समीक्षा” प्रबंधासाठी डॉक्टरेट
१९५३ साली म्हैसूर विद्यापीठातून त्यांनी एम.ए.ची पदवी मिळवली. तसेच तीन वेळा सुवर्णपदके देखील मिळवली. जी.एस. शिवरुद्रप्पा हे कुवेम्पू यांचे विद्यार्थी आणि अनुयायीही होते. ते कुवेम्पू यांच्या साहित्यकृती आणि जीवनापासून खूप प्रेरित होते. १९६५ साली जी.एस. शिवरुद्रप्पा यांना त्यांच्या “सौंदर्य समीक्षा” (Saundarya Sameeksha) या कन्नड भाषेतील प्रबंधासाठी डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली.
बंगळुरु विद्यापीठाच्या कन्नड अभ्यासकेंद्रात अमूल्य योगदान
शिवरुद्रप्पा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४९ साली केली. त्या वेळेस ते म्हैसूर विद्यापीठामध्ये (University of Mysore) कन्नड भाषेचे लेक्चरर म्हणून काम करू लागले होते. त्यानंतर ते १९६३ साली हैदराबादच्या उस्मानिया विद्यापिठात अभ्यासक म्हणून काम करू लागले. नंतर ते तिथले कन्नड विभागाचे प्रमुख झाले. १९६६ सालापर्यंत त्यांनी उस्मानिया विद्यापीठात काम केले. त्यानंतर त्याच वर्षी शिवरुद्रप्पा बंगळुरु विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांची निवड विद्यापीठाचे संचालक म्हणूनही करण्यात आली. त्यानंतर शिवरुद्रप्पा यांनी बंगळुरु विद्यापीठाच्या कन्नड अभ्यास केंद्रात आपले अमूल्य योगदान देणे सुरू ठेवले.
(हेही वाचा – Accident: समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाचा घटनास्थळीच मृत्यू, ४ जखमी)
कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष
दावणगिरी, शिवमोग्गा आणि म्हैसूरसारख्या शहरांमध्ये त्यांनी कन्नड भाषेतून व्याख्याने दिली. १९६६ साली शिवरुद्रप्पा यांनी त्यांचे मुख्यालय बंगळुरू विद्यापीठात हलवले. तिथे त्यांनी १९८६ सालापर्यंत म्हणजेच निवृत्ती घेईपर्यंत तेथील संचालक म्हणून काम केले. त्यानंतर मग १९८७ ते १९९० दरम्यान त्यांनी कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून काम सांभाळले.
शिवरुद्रप्पा यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला महाराजा कॉलेज, म्हैसूर येथे कन्नड भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केले आणि त्यानंतर बंगळुरू विद्यापिठाच्या पदव्युत्तर कन्नड विभागातही काम केले आहे. त्यांच्या कन्नड भाषेतील योगदानाबद्दल राज्य सरकारने शिवरुद्रप्पा यांना ‘पद्मश्री’ (Padmashri) आणि ‘राष्ट्रीय कवी’ या पुरस्कारांनी सन्मानित केले होते. २३ डिसेंबर २०१३ साली बंगळुरु येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्या वेळी तिथल्या राज्य सरकारने जी.एस. शिवरुद्रप्पा (G.S. Shivrudrappa) यांच्या स्मरणार्थ दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community