भारताच्या गगनयान मोहीमेचा पहिला टप्पा शनिवारी (२१ ऑक्टोबर) यशस्वीरीत्या पार पडला. त्यानंतर आता व्योममित्रबद्दल सगळयांना प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. तर या गगनयान मिशनशी संबंधित व्योममित्राच्या या मिशनशी नेमका काय संबंध किंवा काय भूमिका असेल हे जाणून घ्या. (Gaganyan Mission)
व्योमित्र बद्दल जाणून घेण्यापूर्वी त्या नावाचा अर्थ जाणून घेऊया. वास्तविक, व्योमित्र हा दोन संस्कृत शब्दांपासून बनलेला आहे. ‘व्योममित्र’ ( Vyomamitra )शब्द संस्कृत भाषेतील दोन शब्द ‘व्योम’ आणि ‘मित्र’ यांना जोडून बनला आहे, ज्याचा अर्थ क्रमशः अवकाश आणि मित्र असा होतो. म्हणजेच व्योममित्र म्हणजे जो अवकाशाचा मित्र आहे, ज्याला अवकाशाबद्दल सामान्य माणसापेक्षा जास्त माहिती आहे. (Gaganyan Mission)
व्योममित्र ही भारताच्या गगनयान या अंतराळ मोहिमेत पाठवली जाणारी महिला रोबोट आहे. हा ISRO द्वारा विकसित हाफ-ह्यूमनॉइड फीमेल रोबोटचा प्रोटोटाईप आहे. प्रत्यक्षात ही एक महिला ह्यूनॉइड आहे, जिने २०२१मध्ये ह्युमन स्पेसफ्लाइट अँड एक्सलरेशन दरम्यान प्रथमच तिची उपस्थिती दर्शवली.
(हेही वाचा : UP ATS – दहशदवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय महिला सज्ज)
गगनयान मोहिमेत व्योमित्रचं योगदान
गगनयान मोहिमेसोबत व्योममित्र अंतराळातील सर्व प्रकारच्या मानवी क्रियाकलापांचं अनुकरण करेल. हा रोबोट इस्रोला अंतराळातून अहवाल पाठवेल. तो तेथील पर्यावरण नियंत्रण लाईफ सपोर्ट सिस्टीमसोबतही काम करेल. यासोबत व्योममित्र गगनयान मिशनच्या मॉड्यूल पॅरामीटर्सचंही निरीक्षण करेल. व्योमित्र मॉड्युलसाठी अलर्ट पाठवणं, लाईफ सपोर्ट आणि स्विच पॅनल ऑपरेशनचं कामही करू शकतं. हाफ ह्यूमनॉइड व्योममित्रा प्रश्नांची उत्तरंही देऊ शकते. हाफ ह्यूमनॉइड हे नाव यासाठी ठेवण्यात आलं आहे, कारण या रोबोटला पाय नाहीत.
गगनयान भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम
गगनयानही इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल. इस्रोची गगनयान मोहिम तीन टप्प्यांत असेल. दोन मोहिमा मानवरहित तर तिसरी मोहिम मानवी अंतराळ मोहिम असेल. पहिल्या टप्प्यात गगनयान मोहिमेत व्योमित्र नावाचा रोबोट अंतराळात पाठवण्यात येणार आहे. गगनयान मोहिमेत मानवासाठी अनूकुलता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी आधी रोबोट अवकाशात पाठवला जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community