गणेश वासुदेव मावलंकर (Ganesh Vasudev Mavalankar) यांचा जन्म २७ नोव्हेंबर १८८८ रोजी गुजरात राज्यातील वडोदरा येथे झाला. प्रारंभिक शिक्षणानंतर ते उच्च शिक्षणासाठी १९०२ मध्ये अहमदाबादला गेले. त्यांनी गुजरात कॉलेज, अहमदाबाद येथून १९०८ मध्ये विज्ञान शाखेची पदवी घेतली. १९१२ मध्ये त्यांनी कायद्याची परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण केली. कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी १९१३ मध्ये विधी व्यवसायात प्रवेश केला. अल्पावधीतच त्यांची एक प्रथितयश वकील म्हणून ओळख निर्माण झाली.
मावलंकर यांना दादासाहेब म्हटलं जायचं. नेहरु त्यांना लोकसभेचे जनक म्हणायचे. ते पहिल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. कायदेविषयक कामे करताना ते सामाजिक कार्यातही भाग घेत असत. (Ganesh Vasudev Mavalankar) गुजरातमधील अनेक मोठ्या सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता.
त्यांनी १९१३ मध्ये गुजरात एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव आणि १९१६ मध्ये गुजरात सभेचे सचिवपदही भूषवले. १९२० मध्ये ते स्वराज पक्षात सामील झाले पण नंतर ते काँग्रेसमध्ये परतले. पुढे १९४६ मध्ये त्यांची केंद्रीय विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
(हेही वाचा-Sharad Pawar यांची पुन्हा पावसात सभा; राजकीय वर्तुळात चर्चा)
त्यांचा विवाह सुशीला यांच्याशी झाला. सुशीला देखील भारतीय स्वातंत्र्यसैनिक होत्या. विशेष म्हणजे १९५६ मध्ये त्यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत सुशीला बिनविरोध विजयी झाल्या पण १९५७ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही.
१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीपर्यंत मावलंकर मध्यवर्ती विधानसभेचे अध्यक्ष राहिले. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य कायद्यांतर्गत, केंद्रीय विधानसभा आणि राज्य परिषदांचे अस्तित्व संपुष्टात आले आणि भारताच्या संविधान सभेला देशाचा कारभार चालवण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त झाला. भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने मावलंकर (Ganesh Vasudev Mavalankar) यांनी या समितीचे नेतृत्व केले. राष्ट्रनिर्मितीमध्ये त्यांचे योगदान विसरता येत नाही.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community