स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास लाभलेला असाही अनोखा गणेशोत्सव

166

श्री बारभाई गणपती महाराष्ट्र् राज्यातील गणेश उत्सवाचे आगळे आकर्षण आहे. अकोल्यातील श्री बारभाई गणपती अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्द आहे. हा गणपती विविध जाती धर्माच्या एकतेचे प्रतीकही आहे. श्री बारभाई गणपतीला गणेश उत्सवात मानाचा गणपती म्हणून विशेष मान आहे. गणेश उत्सवामध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून हा गणपती प्रथम क्रमांकावर असतो. वऱ्हाडातील सर्वात जुना गणपती म्हणून बारभाई गणपती प्रसिद्ध आहे.

ganapati 8

बारभाई गणपतीला मनाचे स्थान

गणेश उत्सवात या गणपतीला वैशिष्टयपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे, ते त्याच्या आगळ्या वेगळ्या इतिहासानेच. स्वतंत्र पूर्वकाळात लोकमान्य टिळकांनी संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक स्वरुपात गणेश उत्सवाची सुरुवात केली, त्यावेळी किल्ला परीसराजवळील छोट्याशा अकोला शहरात पाच सहा गणेश मंडळाची स्थापना झाली होती. त्यावेळी मिरवणुकीमध्ये प्रथम स्थानाचा मान बारभाई गणपतीला मिळाला होता. त्याकाळी कै. भगवाननाथजी इंगळेसह बाराजातीच्या लोकांनी मिळून या गणपतीची स्थापना केली होती. तेव्हाच या गणपतीला बारभाई गणपती हे नाव मिळाले. त्या काळच्या बाराजातींच्या लोकांनी स्थापन केलेल्या गणपतीचा वारसा आजही कै. इंगळे यांच्या परिवाराने कायम ठेवला आहे.

(हेही वाचा दिल्लीतील गुन्हेगारी संपवण्याचा अमित शहांचा आदेश)

वर्गणी गोळा केली जात नाही

या गणपतीसाठी कोणत्याच प्रकारची वर्गणी गोळा केली जात नाही. यासाठी येणारा पूर्ण खर्च इंगळे परिवार करतो, हे विशेष. बारभाई गणपतीची मूर्ती काळ्या मातीपासून बनवलेली असून, ही मूर्ती ठाकूर समाजातील मोरे नामक कारागिराने बनवली होती. या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही, मिरवणुकीमधील मानाच्या आरती नंतर परत ही मूर्ती त्याच जागी ठेवली जाते. मिरवणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पालखीला उचलण्याचा मान भोई समाजातील लोकांचा असतो. आजूबाजूच्या खेड्यामधून बारभाई गणपती समोर जी भजनी मंडळ, दिंड्या येतात ते ही विविध समाजातील लोकांच्या असतात आणि ते याचा मोबदला म्हणून मूर्तीच्या गळ्यातील हार आणि शेला नारळा शिवाय काहीच स्विकारत नाहीत. बारभाई गणपतीच्या दर्शनाला हजारो भाविक येत असतात. येथे येणाऱ्या भक्तांना या गणपतीचे अनेक अनुभव आल्याचे भक्त सांगतात. त्यामुळेच या भक्तांची असीम श्रद्धा या बारभाई गणपतीवर आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.