नागपूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित स्वयंचलित देखावा श्री अशोकस्तंभ गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, न्यू इतवारी रोड, चितारओळी चौक, नागपूर येथे प्रदर्शित करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ट्रस्टचे हे ४८वे वर्ष आहे. वीर सावरकर यांच्या जीवनातील दोन प्रसंग या देखाव्याद्वारे साकारण्यात आले आहेत. वीर सावरकर यांनी देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घेतलेली स्वतंत्र अखंड भारताची शपथ आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर अंदमानच्या सेल्युलर तुरुंगामध्ये शिक्षा भोगताना कोलूवर काम करताना देण्यात आलेल्या शारीरिक यातना या प्रसंगांद्वारे जनजागृती करण्यात आली.
हा देखावा सादरीकरणास संपूर्ण ट्रस्टचे सदस्य आणि मित्रमंडळींनी अथक परिश्रम घेतले. देखावा बघण्याकरिता दररोज मोठा जनसमुदाय गर्दी करत आहे. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित हा देखावा साकारून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्री अशोकस्तंभ गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट मंडळाला भेट दिली. त्यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित स्वयंचलित देखावा बघितला. यावेळी त्यांनी इतरांनाही हा देखावा बघण्याकरिता प्रोत्साहन दिले.
हेही पहा –