तुमची मुलगी/बहीण ‘इन्स्टाग्राम’वर आहे? मग ती सुद्धा ठरू शकते नराधमांची ‘शिकार’! कशी? वाचा

सोशल नेटवर्किंगच्या जाळ्यात तरुण-तरुणी अडकत आहेत. डोंबिवली येथील प्रकरणात सुद्धा असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

116

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 33 नराधमांनी केलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. या घटनेमुळे आपल्या घरातील मुलींच्या सुरक्षेबाबत प्रत्येक कुटुंबीयांनी धास्ती घेतली आहे. कारण पोलिस आमि प्रशासनाप्रमाणेच मुलींच्या रक्षणाची पहिली जबाबदारी ही कुटुंबीयांचीच असते. सध्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचे जाळे चांगलेच फोफावले आहे. याच जाळ्यात काही तरुण-तरुणी अडकल्याचे पहायला मिळत आहे. डोंबिवली येथील बलात्कार प्रकरणात सुद्धा असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचाः डोंबिवली हादरली! ३३ जणांनी केला ९ महिने बलात्कार)

इन्स्टाग्रामच्या सोशल ‘जाळ्यात’ अडकली पीडिता

डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी ही इन्स्टाग्राम हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफर्म वापरत होती. या प्लॅटफॉर्मवरच तिची ओळख तिच्यावर अत्याचार करणा-या या मुलांसोबत झाली होती. या मुलांपैकी काही जण ठाणे, तर काही डोंबिवली येथे राहणारे आहेत. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून पीडित मुलीचे १७ वर्षांच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले होते. इतर मित्र हे एकमेकांच्या संपर्कातील होते. या मुलांनी पीडितेला सावज म्हणून हेरले होते. त्यासाठीच त्यांनी इन्स्टाग्राम या सोशल जाळ्याचा वापर करत या नराधमांनी तिला आपल्या वासनेचे शिकार बनवले. पोलिस सूत्रांकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

सोशल प्लॅटफॉर्मपासून अल्पवयीन मुलांना दूर ठेवा

इन्स्टाग्राम, फेसबूक यांसारख्या सोशल माध्यमांतून आर्थिक, शारिरीक फसवणुकीच्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहेत. मोबाईल हे अल्पवयीन मुला-मुलींसाठी व्यसन झाले आहे. साधी सही करता येत नसलेल्या वयात त्यांची या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर अकाऊंट ओपन होतात. अनेकदा आपल्या घरातील किंवा आजूबाजूच्यांचे अनुकरण ते सोशल नेटवर्किंग साईटवर करतात. त्यामुळे त्यांना या प्लॅटफॉर्मपासून दूर ठेवण्याची गरज असण्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः डोंबिवलीतील पीडितेवर शेवटी झालेला बलात्कार टाळता आला असता, पण…)

इन्स्टा ‘रील’ मागची ‘रिअ‍ॅलिटी’ समजून घेण्याची गरज आहे. आपल्या मुलांच्या ‘पोस्ट’वर एका अज्ञात ‘घोस्ट’ची नजर आहे. त्यामुळे याकडे ‘काणा’ डोळा न करता ‘तिस-या’ डोळ्याप्रमाणे लक्ष देण्याची गरज आहे. तरच आपल्या मुलांच्या आयुष्याची ‘स्टोरी’ बिघडण्यापासून तुम्ही वाचवू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.