१९ वर्षीय तरुणीवर चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास गोवंडी शिवाजी नगर परिसरात घडली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
अशी घडली घटना
पीडित तरूणी ही शिवाजी नगर परिसरात राहणारी आहे, शनिवारी पहाटे पीडित तरुणी ही कॅटरिंगचे काम करून घरी जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान शिवाजी नगर रोड नंबर १३ येथे एका तरुणाने तिला वाटेत अडवून तुज्या सोबत बोलायचे आहे, असे सांगून तिला एका खोलीत घेऊन आला, त्या खोलीत अगोदरच तिघेजण थांबलेले होते. या चौघांनी तिच्यासोबत लगट सुरू करताच पीडित तरुणीने ओरडण्याचा प्रयत्न केला. या चौघांनी तिचे तोंड दाबून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
(हेही वाचा – माझगावमधील हँकॉक पूलाची पाहणी करण्याची आदित्य ठाकरेंना सपाची आर्जवी)
आरोपीचा शोध घेत दोघांना अटक
पीडित तरुणीने या चौघांच्या तावडीतून सुटका करून पोलिसांना फोन करून मदत मागितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तत्पूर्वीच आरोपींनी तेथून पळ काढला होता. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ४ पथके तयार करून ठाणे, नवीमुंबई परिसरात आरोपीचा शोध घेत दोघांना अटक करण्यात आली असून दोघांचा कसून शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
Join Our WhatsApp Community