मुंबईत तरुणीवर सामूहिक अत्याचार, तिघांना ताब्यात घेत ठोकल्या बेड्या

मुंबईत एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. या तरुणीला तिच्याच चार सहकाऱ्यानी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून चौथ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

(हेही वाचा – कामाख्या देवीचा नवस फिटणार! गुवाहाटी दौऱ्याबाबत शिंदे गटातील ‘या’ आमदाराने म्हटले…)

काय आहे प्रकरण

पीडित तरुणी ही सांताक्रूझ येथील एका इमिटेशन ज्वेलरी कारखान्यात कामाला आहे. त्याच कारखान्यात काम करणाऱ्या इतर ४ सहकाऱ्यांनी तिला शितपेयातून गुंगीचे औधष देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पीडित तरुणी शुद्धीवर आल्यावर तिच्यावर झालेला अतिप्रसंग झाल्याचे लक्षात आले. यानंतर तिने थेट सांताक्रूझ पोलीस ठाणे गाठून झालेल्या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तात्काळ पीडित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवून तिच्या चार सहकाऱ्या विरोधात गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. यानंतर तात्काळ आरोपीचा शोध घेऊन १२ तासांच्या आत ३ आरोपीना अटक केली आहे. या आरोपीना स्स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here