मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती… 30 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि…

186

पुण्यातील सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पश्चिम उपनगरातील साकिनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ३० वर्षीय महिलेवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करुन, तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकण्यात आला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी काही जणांचा या कृत्यात समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमानवीय कृत्य

साकिनाका येथील खैरानी रोड परिसरात हा अमानवीय प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकिनाका पोलिस ठाण्याच्या कंट्रोल रुमला शुक्रवारी पहाटे 3.30च्या सुमारास फोन आला. खैरानी रोड परिसरात एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ताबडतोब महिलेला घोटकोपरच्या राजावाडी पोलिस ठाण्यात दाखल केले आहे. या पीडित तरुणीचे वय 30 वर्षे असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः सूडाने पेटलेल्या महिला पोलिसाने असा रचना खूनाचा कट)

दोघांना अटक

तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, यात अजूनही काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.