गंगाखेड- परळी रोडवर बस आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात; 25 जण जखमी

गंगाखेड- परळी रोडवर बस आणि खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये 25 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

( हेही वाचा: दीड कोटीच्या दरोड्याप्रकरणी चौघांना अटक )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here