एकेकाळी मुंबईवर वर्चस्व असणाऱ्या गँगस्टर पैकी अश्विन नाईक आणि सुरेश पुजारी या दोघांना कोरोना या आजाराची लागण झाली आहे. या दोघांपैकी एकाला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्याला घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरेश पुजारी हा सध्या एटीएसच्या अटकेत असून अश्विन नाईक याची नुकतीच एका गुन्ह्यातून निर्दोष बाहेर आला आहे.
घरातच अश्विन नाईक विलगीकरणात
राज्यासह मुंबईत कोरोनाच्या रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना या कोरोनाने एकेकाळी मुंबईवर वर्चस्व गाजवणाऱ्या गँगस्टर यांना देखील सोडलेले नाही. सप्टेंबर महिन्यात एका खंडणी आणि अपहरणाचा गुन्हयातून निर्दोष मुक्त झालेला डॉन अश्विन नाईक याची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यावेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वय आणि इतर व्याधी पहाता अश्विन नाईकला स्वतःची काळजी घ्यावी लागणार असून अश्विन नाईक याला घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
(हेही वाचा – अखेर आरोग्यमंत्री राजेश टोपेंना मिळणार मुख्यमंत्र्यांचा मान)
पुजारीला रुग्णालयातून सोडताच एटीएस पुन्हा ताबा घेणार
तसेच काही महिन्यांपूर्वी फिलिपाईन्स मधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलेला आणि सध्या महाराष्ट्र एटीएसच्या अटकेत असणारा कुख्यात गुन्हेगार सुरेश पुजारी याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पुजारीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पुजारीला रुग्णालयातून सोडताच एटीएस पुन्हा त्याचा ताबा घेणार असल्याचे सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community