गँगस्टर छोटा शकीलचा आवाज खरा नव्हता! सीआयडी तपासातून उघड

137

बांधकाम व्यवसायिकाला खंडणीच्या गुन्हयात अडकवण्यासाठी एका विशिष्ट साॅफ्टवेअरच्या माध्यमातून गँगस्टर छोटा शकीलचा हुबेहुबे आवाज काढण्यात आला होता, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात समोर आली आहे. संजय पुनामियाने विशिष्ट साॅफ्टवेअरचा वापर करून, ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अग्रवालने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात संजय पुनामिया, परमबीर सिंग सह ९ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली.

सीआयडीकडे जाब नोंदवण्यात आला

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात संजय पुनामिया, परमबीर सिंग, तत्कालीन पोलीस उपायुक्त अकबर पठाण, एसीपी आणि इतर पोलीस अधिकारी सह ९ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून संजय पुनामिया, सुनील जैन या दोघांना अटक केली होती. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सोपवण्यात आला होता. गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी डिसेंबर महिन्यात दोन पोलीस अधिका-यांना अटक केली होती, तसेच परमबीर सिंग यांना समन्स पाठवण्यात आले होते, त्यानंतर सीआयडीने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले होते. परमबीर सिंग यांनी हे अजामीनपात्र वॉरंट न्यायालयातून रद्द करून, सीआयडीकडे याप्रकरणात जबाब नोंदवण्यात आला होता.

( हेही वाचा :विद्यार्थ्यांचे आंदोलन! परीक्षा ऑनलाईन घ्या… दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची मागणी )

खोटी तक्रार करण्यात आली

या गुन्ह्याचा तपास सीआयडीच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. संजय पुनमियानं व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवालला फसवण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर माध्यमातून छोटा शकीलचा आवाज काढण्यात आला होता. तसेच हा फोन खरा वाटावा म्हणून, व्हीपीएनचा वापर करण्यात आला. छोटा शकीलचा ने पुनामियाला फोन करून, धमकी देऊन ५० लाख रुपयांची खंडणी पुनामियाकडे मागण्यात आली होती, असा बनाव करून अग्रवाल यांच्या सांगण्यावरून शकीलने फोन केल्याची खोटी तक्रार पुनामिया याने गुन्हे शाखेकडे केली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुहू पोलीस ठाण्यात अग्रवाल यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून, त्याला मोक्का लावू नये म्हणून कोटयवधी रुपये उकळण्यात आले होते असे अग्रवाल याने आपल्या तक्रारीत म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.