दाऊदचा पुतण्या मुंबई पोलिसांच्या हातून निसटला, थेट पोहचला पाकिस्तानात!

अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने २०१८ मध्ये नार्को टेरारिझम प्रकरणात अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकर हा स्पेन मार्गे पाकिस्तानात पोचल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानात सुखरूप पोचल्याचा निरोप त्याने मुंबईतील एका नातेवाईकांना फोन वरून दिल्यानंतर साहिल पाकिस्तानमध्ये गेल्याचे समोर आले आहे. सोहेलला मुंबई पोलिसांची यंत्रणा भारतात घेऊन येण्यासाठी प्रयत्न करीत होती, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे दाऊदचा पुतण्या मुंबई पोलिसांच्या हातून निसटला. सोहेल कासकर हा दाऊद याचा भाऊ नूरा याचा मुलगा असून नूरा याचा काही २०१० मध्ये किडनीच्या आजाराने मृत्यू झाला आहे.

…तर मुंबई पोलिसांना ठावठिकाणा शोधता आला असता

अमेरिकेच्या एका सुरक्षा यंत्रणेने २०१८ मध्ये सोहेल कासकर आणि दानिश अली या दोघांना नार्को टेररिझम प्रकरणात अटक केली होती. दाऊदच्या पुतण्याला अटक केल्याचे कळताच भारतातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रयत्न सुरु केले होते, मात्र मुंबई पोलीस यामध्ये अपयशी ठरली मात्र दानिश अली याला भारतात आणण्यात आले होते. भारत आणि अमेरिका या देशाच्या दोन्ही यंत्रणेत समन्वय अभावी सोहेल हा मुंबई पोलिसांच्या हाती लागला नाही. सोहेल ला मुंबई पोलिसांच्या हाती लागला असता आणि त्याला भारतात घेऊन येण्यात यश आले असते तर मुंबई पोलिसांना दाऊदचा ठावठिकाणा शोधून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवता आले असते अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

(हेही वाचा –भूमिगत जल बोगद्याच्या कामात ‘मुंबई’चा जगात दुसरा क्रमांक!)

त्याला भारताच्या हवाली न देता सोडून दिले

सोहेल, दानिशसह चार जणांना अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने अटक केल्यानंतर हे प्रकरण एफबीआय (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) यांच्याकडे सोपवण्यात आले होते. एफबीआय न्यायालयाने सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांना शिक्षा ठोठावली होती. सोहेलकडे भारतीय पासपोर्ट मिळून आल्यानंतर त्याला भारताच्या हवाली करायची तयारी सुरु असता सोहेलकडे पाकिस्तानी पासपोर्ट देखील मिळून आल्यामुळे त्याला भारताच्या हवाली न देता सोडून देण्यात आले होते. येथून बाहेर पडताच सोहेल हा स्पेन मार्गे पाकिस्तानमध्ये पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here