दोन्ही टोकांना रस्त्याच्या जाळ्यांनी जोडण्याचं काम वेगानं सुरू असताना आता रस्ते, रेल्वेसोबत नैसर्गिक वायू पुरवठा विस्ताराची योजना केंद्र सरकारने आखली आहे. यासंदर्भातील घोषणा सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या गेल (इंडिया) लिमिटेडने केली आहे. काश्मीर खोऱ्यात पर्यावरणपूरक नैसर्गिक वायू वाहून नेण्यासाठी श्रीनगरमध्ये पाइपलाइन टाकण्याची कंपनीची योजना आहे, असे गेल (इंडिया) लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज जैन यांनी सांगितले. यापुढे त्यांनी असेही सांगितले की, सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार केला जात आहे.
संपूर्ण भारताला गॅस पुरवठा केला जाणार
मुंबई ते नागपूर 700 किमीची पाईपलाईन टाकण्याचे काम मे 2023 पर्यंत पूर्ण करणार असून ज्यामुळे संपूर्ण भारताला गॅस पुरवठा केला जाणार आहे. नैसर्गिक वायूच्या वापराला केंद्रानं अग्रक्रम दिला असून भारताची ऊर्जा दिवसागणिक वाढत आहे. महत्त्वाकांक्षी उर्जा गंगा प्रकल्पाचा मोठा भाग निर्धारित वेळापत्रकानुसार 2022 च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. तर वर्ष 2030 पर्यंत नैसर्गिक वायूचा वापर 6.7 टक्क्यांनी वाढून 15 टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. 425 किलोमीटर लांबीची गुरुदासपूर (पंजाब राज्य) ते श्रीनगर (जम्मू) पर्यंत पाईपलाईन विस्तारासाठी (पीएनजीआरबी) कडून मंजूरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जैन यांनी सांगितले.
(हेही वाचा – राज्यातील पाच ऑलिव्ह रिडले कासवांचा भ्रमंती मार्ग कसा शोधणार? जाणून घ्या… )
भारतातील दुर्गम भागात जाळ विस्तारणार
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी 3 ते 4 वर्षात योजना पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. नैसर्गिक वायूला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांकडे कर कपातीची मागणी केली आहे. सध्या मुंबई ते झारसुगुडा (ओडिशा) मार्ग नागपूर आणि छत्तीसगडच्या रायपूर पर्यंत 1,405 किलोमीटर पाईपलाईन टाकत आहे. नागपूर पर्यंतचे काम मे 2023 सुरू होईल आणि उर्वरित काम दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. याकरता भारतातील दुर्गम भागात जाळ विस्तारण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
Join Our WhatsApp Community