मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; भोस्ते घाटात टॅंकर उलटल्यामुळे गॅसगळती, परिसरात भितीचे वातावरण

164

मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. खेड-रत्नागिरी मार्गावरीव भोस्ते घाटमध्ये अवघड वळणावरती गॅसची टॅंकर पलटी होऊन गॅसगळती सुरू झाल्याने घाटातील संपूर्ण वाहतूक बंद करण्याचा निर्णय स्थानिक पोलिसांकडून घेण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आहेत.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांना हवे मालकी हक्काचे घर)

टॅंकर पलटी झाल्यामुळे तेलगळती

भोस्ते घाटातील अवघड वळणावरती महिन्याला ३ ते ४ अपघात होतात. मंगळवारी सायंकाळी LPG गॅसची वाहतूक करणारा टॅंकर पलटी झाल्यामुळे तेलगळती सुरू आहे. यामुळे संपूर्ण महामार्गावरील वाहतूक स्थानिक पोलिसांनी तात्काळ थांबवली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या गॅसचा उग्र वासही संपूर्ण परिसरात पसरला आहे. घाटाच्या दोन्ही बाजूला पोलिसांनी थांबे लावत सध्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वाहतूक बंद केली आहे.

आपात्कालीन टीम घटनास्थळी दाखल

आपात्कालीन टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झालेली आहे. या अपघातामुळे संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. खेडच्या बाजूने वेरळ आणि जांभूर्डे दरम्यानचा हा घाट सध्या तात्पुरता बंद करण्यात आला असून तेलगळतीमुळे कोणालाही प्रवासासाठी परवानगी नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.