अदानींना आणखी एक झटका; फ्रान्ससोबत 50 अब्ज डाॅलर्सचा करार स्थगित

145

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या मागे लागलेले अडचणींचे सत्र काही केल्या कमी होत नाही. त्यातच आता फ्रान्सच्या टोटल एनर्जीज या ऊर्जा क्षेत्रातील बलाढ्य कंपनीने अदानी समूहाबरोबर केलेली भागीदारी स्थगित केली आहे. अदानींच्या तब्बल 50 अब्ज डाॅलर्सच्या हायड्रोजन प्रकल्पात ही  सर्वांत मोठी परदेशी गुंतवणूक आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोपांबाबत स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय प्रकल्प पुढे जाणार नसल्याचे टोटल एनर्जीजने जाहीर केले आहे.

जून 2022 मध्ये टोटल एनर्जीजने अदानी समूहाबरोबर भागीदारी जाहीर केली होती. फ्रान्सीस समूहाचे मुख्य कार्यपालक पॅट्रिक पौयान यांनी सांगितले की, मागच्या वर्षी जून महिन्यात अदानी समूहासोबत आम्ही भागीदारी जाहीर केली होती. मात्र, आतापर्यंत कारारावर स्वाक्ष-या झाल्या नव्हत्या. जून 2022 रोजी झालेल्या घोषणेनुसार, टोटल एनर्जीजने अदानी समूहाची कंपनी अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत 25 टक्के भागिदारी घ्यायची होती. हरित हायड्रोजन प्रकल्पासाठी पुढील दहा वर्षांसाठी तब्बल 50 अब्ज डाॅलर्सची गुंतवणूक होणार होती. 2030 च्या आधी एक अब्ज टन क्षमतेचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

( हेही वाचा: त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभा-यात अमरनाथ प्रकटल्याचा दावा खोटा; मंदिर पुजा-यांचा संताप )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.