अदानी एंटरप्रायझेसने 20 हजार कोटींचा एफपीओ मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत अदानी समूहाने परिपत्रक जारी केले आहे. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे. पूर्ण झालेले व्यवहार माघारी घेत आपल्या गुंतवणुकदारांचे हित लक्षात घेत एफपीओ मागे घेत असल्याचे अदानी समूहाने परिपत्रकात सांगितले आहे.
अदानी समुहाच्या शेअर्समध्ये तब्बल 28 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर अदानी इंटरप्राईजेसने 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ रद्द केला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या एफपीओमध्ये पैसे गुंतवले होते त्यांना ते परत केले जातील, असे परिपत्रकात म्हटले आहे.
( हेही वाचा: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ठाकरेंच्या कार्यकाळात रखडला; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप )
कंपनीमधील सदस्यांच्या हितासाठी एफपीओ मागे घेण्याचा निर्णय
अदानी समुहाने नुकताच अदानी एंटरप्रायजेस याचा FPO जारी केला होता. 31 जानेवारीपर्यंत गुंतवणूकधारकांना पैसे गुंतवण्याची संधी दिली होती. पण कंपनीने एफपीओ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या संचालक मंडळाची गुरुवारी बैठक झाली, कंपनीमधील सदस्यांच्या हितासाठी एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला. अदानी समुहाकडून गुंतवणूकधारकांना पैसे परत दिले जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community