अदानी बनले ‘सिमेंट किंग’! ‘अंबुजा आणि एसीसी’ कंपन्या केल्या टेक ओव्हर

114

अदानी ग्रुप आता सिमेंटच्या क्षेत्रातही उतरली आहे. अंबुजा आणि एसीसी या सिमेंट क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या अदानी ग्रुप टेकओव्हर करत आहेत. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी हा व्यवहार करण्यासाठी गेल्या आठवड्यात अबुधाबी आणि लंडनला गेले होते. हा व्यवहार 10.5 अब्ज डाॅलर्सचा आहे. या कंपन्या टेकओव्हर केल्याचे, गौतम अदानी यांनी ट्वीट करुन जाहीर केले आहे.

गौतम अदानींचे ट्वीट

एसीसी म्हणजे एसोसिएटेड सिमेंट कंपनीवर मालकी हक्क हा होलसीम कंपनीचा आहे. ही स्वित्झर्लंडची बिल्डिंग मटेरियलची कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात 1 ऑगस्ट 1936 साली मुंबईत झाली होती. काही ग्रुप्सने एकत्र येऊन, या कंपनीची सुरुवात केली होती. या कंपनीचे टेकओव्हर केल्याचे, गौतम अदानी यांनी ट्वीट करुन सांगितले आहे. ट्वीटमध्ये अदानी म्हणाले की, भारताच्या कहाणीवर आमचा ठाम विश्वास आहे. होलसीमच्या सिमेंट मालमत्तेचा आमच्या ग्रीन एनर्जी आणि लाॅजिस्टिकशी जोडल्याने, आम्ही भारतातील सिमेंटच्या जगातील सर्वात ग्रीनेस्ट सिमेंट कंपनी झालो आहोत.

( हेही वाचा: उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत 39 भाविकांचा मृत्यू )

17 वर्षांचा कारभार आटोपणार होलसीम

होलसीम कंपनीने भारतात 17 वर्षांपूर्वी व्यवसाय सुरु केला होता. ती जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी मानली जाते. या करारानंतर आता कंपनी भारतातील त्यांचा व्यवसाय बंद करणार आहे. एसीसी कंपनीत अंबुजाचा 50 टक्क्यांचा वाटा आहे. तर होलसीम कंपनीचा 4.47 टक्के वाटा आहे.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.