GDP Growth : चालू आर्थिक वर्षांत विकास दर ६.५ टक्क्यांवर राहण्याचा अर्थ मंत्रालयाचा अंदाज

GDP Growth : वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जीडीपीला चांगली उभारी येईल असा अंदाज आहे 

45
GDP Growth : चालू आर्थिक वर्षांत विकास दर ६.५ टक्क्यांवर राहण्याचा अर्थ मंत्रालयाचा अंदाज
GDP Growth : चालू आर्थिक वर्षांत विकास दर ६.५ टक्क्यांवर राहण्याचा अर्थ मंत्रालयाचा अंदाज
  • ऋजुता लुकतुके

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ६.५ टक्के इतका असेल असा अंदाज केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वर्तवला आहे. जागतिक स्तरावर युद्ध आणि अनियमित हवामान यांचं सावट जगभर आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे होतच राहणार आहे. पण, वर्षाच्या शेवटच्या सहामाहीत जीडीपी विकास चांगला वेग पकडेल, असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. (GDP Growth)

(हेही वाचा- भारतीय उद्योगविश्वात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले, असे उद्योगपती Ratan Naval Tata…)

या कालावधीत ग्रामीण भागातून वस्तू व सेवांना असलेली मागणी कायम राहील. तर शहरी भागांतून होणारी मागणी वाढेल. आणि त्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू शकेल. चालू आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबर तिमाहीत देशातली उत्पादन क्षेत्राची पिछेहाट झाली आहे. शिवाय लोकांकडूनही मागणी कमी झाली होती. त्यातच जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे महागाई दर चढा होता. या सगळ्याचा परिणाम विकासाच्या गतीवर झाला आहे. पण, जगातील काही प्रगत देशांपेक्षा भारताचा विकास दराचा अंदाज अजूनही चढाच आहे. (GDP Growth)

‘मध्यवर्ती बँकेनं कर्जाचे व्याजदर कमी न करण्याचा घेतलेला पवित्रा आणि जगभरातील वाढती महागाई व इतर मॅक्रो स्तरावरील घटक यामुळे पहिल्या सहामाहीत देशात वस्तू आणि सेवांची मागणी घटली आहे. त्याचा परिणाम उत्पादन कमी होण्यावरही झाला आहे. आणि परिणामी विकासदर म्हणावा तसा वाढलेला नाही,’ असं या अहवालात अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेला अलीकडे अमेरिकन डॉलरसमोर ढासळत्या रुपयाच्या समस्येनंही ग्रासलं आहे. त्यामुळे भारताची परकीय गंगाजळी कमी होत आहे. आणि आयातीची किंमतही वाढतेय. आणि त्यावर उपाय करता करता मध्यवर्ती बँकेला दर कपात शक्य होत नाहीए. (GDP Growth)

(हेही वाचा- Himachal Snowfall: हिमाचलमध्ये बर्फवृष्टी पाहण्यासाठी 48 तासांत 80 हजार वाहनांतून आले 3 लाख पर्यटक)

तर अमेरिकेत पुन्हा ट्रंप प्रशासन सुरू होणार असल्यामुळे जागतिक व्यापारविषयक अनिश्चितता वाढली आहे. अमेरिकेची येत्या काळातील धोरणं नेमकी काय असतात याकडे जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. भारतातील देशांतर्गत घटक मात्र नवीन वर्षात नियंत्रणात राहतील. आणि चांगल्या पावसामुळे कृषि समस्याही राहणार नाही, असा अंदाज आहे. (GDP Growth)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.