चित्रपटसृष्टीत गीता दत्त (Geeta Dutt) म्हणून प्रसिद्ध असलेल्या गीता घोष राय चौधरी यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९३० रोजी फरीदपूर शहरात झाला. जेव्हा त्या फक्त १२ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे कुटुंब फरीदपूर (Faridpur) येथून मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे वडील जमीनदार होते. गीता दत्त यांचा बालपणापासूनच संगीताकडे कल होता. त्यांना पार्श्वगायिका व्हायचे होते. गीता दत्त यांनी त्यांचे प्रारंभिक संगीत शिक्षण हनुमान प्रसाद यांच्याकडून घेतले.
(हेही वाचा – Air Pollution Mitigation : बीकेसीतील मेट्रो प्रकल्पाच्या कामाला महापालिकेची स्टॉप वर्क नोटीस)
‘भक्त प्रल्हाद’ चित्रपटासाठी गाण्याची संधी
१९४६ मध्ये गीता दत्त यांना पहिल्यांदा ‘भक्त प्रल्हाद’ (Bhakta Prahlad) चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. गीता दत्त यांनी ‘कश्मीर की कली’ (Kashmir Ki Kali), रासिली, सर्कस किंग सारख्या काही चित्रपटांसाठी देखील गायन केले आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले नाहीत. पुढे महान संगीतकार एस.डी. बर्मन यांनी गीता दत्त यांच्यातला कलाकार हेरला. मग बर्मन यांनी ‘दो भाई’ चित्रपटासाठी गाण्याची ऑफर दिली.
‘मेरा सुंदर सपना बीत गया’ गाणे लोकप्रिय
१९४७ साली प्रदर्शित झालेला ‘दो भाई’ हा चित्रपट गीता दत्त यांच्या सिने करिअरमधला एक महत्त्वाचा चित्रपट ठरला आणि या चित्रपटातील त्यांने गायलेले ‘मेरा सुंदर सपना बीत गया’ (Mera Sundar Sapna Beet Gaya) हे गाणे खूप लोकप्रिय ठरले. या चित्रपटानंतर त्या पार्श्वगायिका म्हणून नावारूपाला आल्या.
(हेही वाचा – Temple : रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू – सुनील घनवट)
‘खयालों में किसी के इस तरह आया नहीं करते’, ‘सुनो गजर क्या गाए’, ‘न ये चाँद होगा’, ‘न ये तारे रहेंगे’, ‘कैसे कोई जिए’, ‘जहर है जिन्दगी’, ‘जाने कहाँ मेरा जिगर गया जी’, ‘जाता कहाँ है दीवाने’, आज सजन मोहे अंग लगा ले, मेरा नाम चिन-चिन चू, वक्त ने किया क्या हँसीं सितम ही त्यांची गाजलेली गाणी आहेत. (Geeta Dutt)
बाजी चित्रपटाच्या यशाने नशीब बदलले
बाजी (Baazi) चित्रपटाच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंग दरम्यान त्यांची दिग्दर्शक गुरु दत्त यांच्याशी भेट झाली. ’तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान गुरुदत्त त्यांच्या प्रेमात पडले. गीता दत्त यांनी १९५३ मध्ये गुरु दत्त यांच्याशी लग्न केले. तसेच बाजी चित्रपटाच्या यशाने गीता दत्त यांचे नशीब बदलले.
गीता दत्त यांनी बंगाली चित्रपटांसाठी देखील गाणी गायली आहेत. गीता दत्त यांनी तब्बल तीन दशके आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पुढे त्यांची प्रकृती ढासळू लागल्याने त्यांनी गायन कमी केले. ४१ व्या वर्षी २० जुलै १९७२ रोजी त्यांचे निधन झाले. (Geeta Dutt)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community