George Adamson : ‘बॉर्न फ्री’ नावाच्या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक जॉर्ज ऍडमसन

George Adamson : 'बॉर्न फ्री' नावाच्या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक जॉर्ज ऍडमसन

222
George Adamson : 'बॉर्न फ्री' नावाच्या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक जॉर्ज ऍडमसन
George Adamson : 'बॉर्न फ्री' नावाच्या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक जॉर्ज ऍडमसन

जंगल बुक (Jungle Book) हा चित्रपट किंवा मालिका कुणी पाहिली नसेल, असे होणारच नाही. त्यात सगळे प्राणीच मोगलीचे मित्र, आई-बाबा होते. मात्र खर्‍या आयुष्यात जर कोणाला सिंहाचा बाबा किंवा सिंहाचे वडील म्हणत असतील तर? होय! हे खरंय. त्यांचं नाव आहे जॉर्ज ऍडमसन. (George Adamson) त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९०६ रोजी उत्तरप्रदेशातील इश्तिकापूरी येथे झाला. त्यांचे आईवडील इंग्लिश व आयरीश होते.

(हेही वाचा – रामलल्लाला ४ दिवसांत करोडो रुपयांचे दान)

“बॉर्न फ्री” नावाचे बेस्टसेलर पुस्तक 

त्यांचं शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. मात्र पुढे ते वडिलांसोबत १९२४ मध्ये केनियाला गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी काही लहानसहान कामे केली. त्यानंतर १९३८ मध्ये ते केनियाच्या वनविभागात दाखल झाले. त्यांचा विवाह जॉय सोबत झाला. जॉयने एक बेस्टसेलर पुस्तक लिहिले आहे, “बॉर्न फ्री” (Born Free) नावाचे. त्यांनी एल्सा नावाच्या सिंहिणीचे पालनपोषण केले होते. पुढे त्यांनी तिला जंगलात सोडून दिले. त्यांच्या या अनुभवावरच बॉर्न फ्री हे पुस्तक आधारित आहे.

१९६० मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले आणि ते खूप गाजले. त्यामुळे या पती-पत्नींना सबंध जग ओळखू लागले. १९६६ मध्ये याच नावाचा एक चित्रपटही तयार करण्यात आला. १९७० मध्ये ते उत्तर केनियातील कोरा नॅशनल रिझर्व्हमध्ये राहायला गेले. मात्र पुढे या नवरा-बायकोचे पटले नाही म्हणून ते विभक्त झाले. ३ जानेवारी १९८० मध्ये जॉयची हत्त्या झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या मृत्यूनंतर ९ वर्षांनी म्हणजे १९८९ मध्ये कोरा नॅशनल पार्क, केनिया येथे सोमाली डाकुंनी जॉर्जची हत्या केली. नवरा-बायको विभक्त झाल्यानंतरही एकाच पद्धतीने मारले गेले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.