Gerald Durrell: ब्रिटिश निसर्गवादी, लेखक आणि टेलिव्हिजन प्रेजेंटर ‘गेराल्ड ड्युरेल’

Gerald Durrell: गेराल्ड ड्युरेल यांचा जन्म जमशेदपूर येथे ७ जानेवारी १९२५ रोजी झाला. त्यांचे वडील ब्रिटीश अभियंता होते.

202
Gerald Durrell: ब्रिटिश निसर्गवादी, लेखक आणि टेलिव्हिजन प्रेजेंटर 'गेराल्ड ड्युरेल'
Gerald Durrell: ब्रिटिश निसर्गवादी, लेखक आणि टेलिव्हिजन प्रेजेंटर 'गेराल्ड ड्युरेल'

गेराल्ड माल्कम ड्युरेल हे ब्रिटीश निसर्गवादी, लेखक, झुकीपर, संरक्षणवादी आणि टेलिव्हिजन प्रेझेंटर होते. त्यांनी १९५९ मध्ये जर्सीच्या चॅनेल आयलंडवर ड्युरेल वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशन ट्रस्ट आणि जर्सी झूची स्थापना केली. गेराल्ड हे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते आणि विविध क्षेत्रांत काम करण्याबाबत त्यांचा हात कुणी पकडू शकत नव्हतं.

गेराल्ड ड्युरेल यांचा जन्म जमशेदपूर येथे ७ जानेवारी १९२५ रोजी झाला. त्यांचे वडील ब्रिटीश अभियंता होते. ड्युरेल यांचे पालनपोषण त्यांच्या आयाने केले. ब्रिटिश प्रतिष्ठित कुटुंबात ही अतिशय सामान्य बाब होती. लहानपणापासून ड्युरेल यांचे प्रण्यांवर प्रेम होते. बालपणी भारतात प्राणी संग्रहालयाला दिलेली भेट त्यांना नेहमी आठवत राहायची. त्यांचा जन्म भारतात झाला असला, तरी वडिलांच्या निधनानंतर १९२८ रोजी त्यांचे कुटुंब ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आणि तिथेच त्यांचे शिक्षण झाले.

(हेही वाचा – Parliament Security Breach : 6 पैकी 5 आरोपींची होणार पॉलीग्राफी टेस्ट; कोठडीत 13 जानेवारीपर्यंत वाढ)

त्यांनी सुमारे ४० पुस्तके लिहिली. ही पुस्तके प्रामुख्याने प्राणी संग्राहक आणि प्राण्यांसोबत घालवलेल्या त्यांच्या आयुष्यावर बेतलेली आहेत. १९५६ मध्ये प्रकाशित झालेले ‘माय फॅमिली ऍंड अदर ऍनिमल्स’ हे पुस्तक खूपच गाजलं.

१९८७ साली प्रदर्शित झालेली माय फॅमिली अँड अदर अॅनिमल्स आणि १९८७ साली आलेली द ड्युरेल्स ही मालिका म्हणजे ग्रीसमध्ये असताना प्राण्यांसोबतच्या त्यांच्या आठवणी आहेत. त्यांची वेगळी ओळख म्हणजे सुप्रसिद्ध कादंबरीकार लॉरेन्स ड्युरेलचा हे त्यांचे मोठे बंधू आहेत. ३० जानेवारी १९९५ रोजी वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.