फ्रेडरिक मॅक्स म्युलर (Max Müller) हे जर्मन भाषाशास्त्रज्ञ आणि प्राच्यविद्या शास्त्रज्ञ होते. वेस्टर्न अकॅडेमिक डिसिप्लिन्स ऑफ इंडियन स्टडीज ऍंड रिलिजियस स्टडीजचे ते संस्थापक सदस्य होते. मुल्लर यांनी इंडोलॉजी या विषयावर विद्वत्तापूर्ण लेखन केले आहे. द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट (The Sacred Books of the East) हा इंग्रजी अनुवादाचा ५० खंडांचा संच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला.
(हेही वाचा – Modi Government : मोदी सरकारच्या काळात दंगलींच्या घटना ५० टक्क्यांनी घटल्या)
१८ व्या वर्षीच हितोपदेशाचा संस्कृत अनुवाद
मॅक्स म्युलर यांचा जन्म ६ डिसेंबर १८२३ रोजी डेसाऊ येथे झाला. गीतकार व कवी विल्हेल्म मुल्लर हे त्यांचे वडील. त्यांची आई अॅडलहेड म्युलर ह्या पंतप्रधान Anhalt-Dessau यांच्या सर्वात मोठ्या सुपुत्री होत्या. इतक्या मोठ्या कुटुंबात मॅक्स म्युलर (Max Müller) यांचा जन्म झाला. स्वतः मॅक्स म्युलर हे प्रचंड विद्वान होते. त्यांना संस्कृत पंडित (Scholar of Sanskrit) म्हटलं जातं. विशेष म्हणजे वयाच्या १८ व्या वर्षीच त्यांनी हितोपदेशाचा संस्कृत अनुवाद केला.
ऋगवेदाची संशोधित व प्रमाणित देवनागरी प्रत बनवली
१८४९ दरम्यानची गोष्ट. जेव्हा मॅक्स म्युलर (Max Müller) यांनी ऋगवेदाची संशोधित व प्रमाणित देवनागरी प्रत तयार केली, तेव्हा त्यांना कोणी मुद्रक मिळत नव्हता. मग त्यांनी हस्तलिखित तयार केले व युरोपमध्ये देवनागरीत पुस्तक छापू शकेल, असा छापखाना उपलब्ध नसताना त्यांनी देवनागरीत अक्षरे लिहिली व त्यांचे खिळे तयार करुन ऋग्वेदाची (Rigveda) पहिली प्रत ऑक्सफोर्ड विद्यापीठाने छापली.
भारतीय संस्कृतीबद्दलचा अभ्यास वाखाणण्याजोगा
मुल्लर यांनी भारतीय वाङ्मय, संस्कृती, ऋषिमुनी, ऋचा, मंत्र यांचे अध्ययन केले. १८५० दरम्यान त्यांनी अर्वाचीन युरोपीय भाषांचे अध्ययन सुरु केले. त्यांची व्याख्याने देखील पुष्कळ गाजली. १८७२ मध्ये स्ट्रासबर्ग विद्यापीठातील त्यांची व्याख्याने जगप्रसिद्ध ठरली. १८९६ रोजी त्यांना इंग्लंडच्या प्रिव्ही काऊन्सिलवर नेमण्यात आले. विशेष म्हणजे मॅक्स म्युलर (Max Müller) यांनी कधीही भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले नव्हते. तरी देखील भारतीय संस्कृतीबद्दलचा (Indian culture) त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community