जर्गन हॅबर्मस (Jurgen Habermas) यांचा जन्म १८ जून १९२९ साली जर्मनीत झाला होता. जर्गन हॅबर्मस (Jurgen Habermas) हे एक जर्मन तत्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि वेगवेगळ्या समाजातल्या लोकांचा अभ्यास करतात.
जर्गन हॅबर्मस (Jurgen Habermas) हे क्रिटिकल थिअरी नावाचा एक प्रकारचा सिद्धांत वापरतात. या सिद्धांतामध्ये लोक आपल्या शक्तीचा वापर कसा करतात याचा ते अभ्यास करतात. याव्यतिरिक्त ते अमेरिकन व्यवहारवादाचा सिद्धांत देखील वापरतात. या व्यवहारवादाच्या सिद्धांतामध्ये कृतींच्या परिणामांनुसार जर्गन हॅबर्मस (Jurgen Habermas) हे सत्याचा पडताळा करून पाहतात.
विशेषतः सार्वजनिक क्षेत्राच्या सिद्धांतावर काम करण्यासाठी जर्गन हॅबर्मस (Jurgen Habermas) प्रसिद्ध आहेत. तसेच ते लोकशाही आणि राजकारणातील सत्तेचाही अभ्यास करतात. लोकभाषेच्या संवादाद्वारे समाजाचा विकास कसा करता येईल या गोष्टीचाही ते अभ्यास करतात. तसेच समाज आणि सरकार हे दोन्ही एकत्र मिळून कसे कार्य करतात हे समजून घेण्याचा ते प्रयत्न करतात.
(हेही वाचा – Street Food : मुंबईतील खाद्यपदार्थ विक्रेते महापालिकेच्या रडारवर, मुख्य टार्गेट असेल ‘हा’ भाग)
जर्गन हॅबर्मस (Jurgen Habermas) यांचं पालनपोषण प्रोटेस्टंट पंथातल्या एका कुटुंबात झालं. ते कोलोन शहराजवळच्या गुमर्सबॅक येथे राहत होते. जर्गन हॅबर्मस यांनी जिम्नॅशिअममध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे.
जर्गन हॅबर्मस (Jurgen Habermas) यांचं शिक्षण गॉटिंगेन, झ्यूरीक आणि बॉन अशा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये झालं. त्यांनी १९५४ साली बॉन विद्यापीठातून दास ॲब्सोल्युट ऍंड डाय गेशिच्ते या विषयावर रिसर्च करून पी.एच.डी. मिळवली.
१९५६ सालापासून जर्गन हॅबर्मस (Jurgen Habermas) यांनी जोहान वुल्फगँग गोएथे विद्यापीठ, फ्रँकफर्ट ॲम मेन येथे क्रिटिकल थिअरिस्ट मॅक्स हॉर्कहाईमर आणि थिओडोर ॲडॉर्नो यांच्या अंतर्गत तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्राचा अभ्यास केला. त्याचं कारण असं की, हॉर्कहाईमरने जर्गन हॅबर्मस यांना त्यांच्या प्रबंधात काही बदल करायला सांगितलं होतं. पण जर्गन हॅबर्मस (Jurgen Habermas) यांना ते करायचं नव्हतं. तसंच फ्रँकफर्ट विद्यापीठ हे आधुनिक संस्कृतीबद्दलच्या त्यांच्या मतांनुसार योग्य नाही असं त्यांना वाटलं. म्हणून जर्गन हॅबर्मस हे फ्रँकफर्ट विद्यापीठातून बाहेर पडले.
(हेही वाचा – Agniveer Recruitment साठी वायुसेनेची ऑक्टोबरमध्ये परीक्षा; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज)
त्यांनी मार्क्सवादी वुल्फगँग ॲबेंड्रॉथच्या अंतर्गत मारबर्ग विद्यापीठात राज्यशास्त्र या विषयात सर्वोच्च शैक्षणिक पदवी शिक्षण पूर्ण केलं. १९६१ साली ते मारबर्गमध्ये प्रायव्हेट डोझंट झाले. त्यांनी हेडलबर्ग विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे “एक्स्ट्राऑर्डीनरी प्रोफेसर” म्हणून काम करायला सुरुवात केली. हॅन्स-जॉर्ज गॅडमर आणि कार्ल लोविथ यांनी त्यांना ही नोकरी मिळवून दिली होती. १९६४ साली जर्गन हॅबर्मस (Jurgen Habermas) हे फ्रँकफर्टला परत आले. तिथे त्यांनी हॉर्कहाईमर यांनी प्रदान केलेली तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र या विषयावर अभ्यास करण्याची नोकरी स्वीकारली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community