संपूर्ण विश्व सध्या इंग्रजी नवीन वर्ष साजरे करण्याच्या तयारीत आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली असली तरी राज्याची छोटी राजधानी असलेल्या नागपुरात अवघ्या पाच रूपयांत परवाना घ्या आणि 31 डिसेंबर रोजी मद्यप्राशन करता येणार आहे. नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या मद्यपीसांठी ॲानलाईन आणि ॲाफलाईन परवाण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती मिळतेय. 31 डिसेंबरला एका दिवसासाठी एका व्यक्तीला पाच रुपयांत मद्यप्राशन परवाना देण्यात येत आहे, तर पार्टीसाठी तीन हजार ते 30 हजार, अशाप्रकारे शुल्क आकारुन परवाना देण्यात येत आहे.
ॲानलाईन आणि ॲाफलाईन परवान्यांची सोय
नव वर्षाचं स्वागत अनेक जण 31 डिसेंबर वर्षाअखेरीस मद्य प्राशन करून करतात. या मद्यप्रेमींसाठी नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनोखीच तयारी केल्याचे दिसतेय. यासाठी ॲानलाईन आणि ॲाफलाईन परवान्यांची सोय असणार आहे. एका व्यक्तीला 31 डिसेंबरला दारु पिण्यासाठी पाच रुपये शुल्क आकारुन परवाने देण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाकडून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – दीपा बारवरील छाप्यानंतर मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय)
राज्यात मद्यावरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात
राज्य सरकारने आयात केलेल्या स्कॉच, व्हिस्कीसह काही मद्यावरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यात विक्री होणाऱ्या स्कॉच, व्हिस्कीची किंमत इतर राज्यांतील किंमतीएवढी झाली आहे. दर कमी केल्याने अवैध विक्रीला आळा बसण्यास मदत होणार आहे. इतकेच नाही तर महसुलात वाढ होणार असल्याचा दावा शासनाचा आहे. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून राज्याला शेकडो कोटींचा महसूल मिळत असून या शुल्क कपातीमुळे सरकारच्या महसुलात 200 ते 250 कोटींची भर पडण्याची अपेक्षा आहे.
Join Our WhatsApp Community