अरेच्चा! कोरोनाची लस घेतली आणि तरूणी झाली करोडपती

135

गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोना महामारीने कहर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वर्ष उलटून गेले तरी अद्याप कमी झालेला नाही. जीवघेण्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोनाला आळा घालायचा असेल तर कोरोना लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे म्हटले जात आहे. तर अजूनही काही लोकांच्या मनात कोरोना लसीसंदर्भात संभ्रम असल्याचे दिसतेय. कोरोनाची लस सर्व नागरिकांनी घ्यावी, म्हणून काही देश आपल्या देशवासियांना लस घेण्यास प्रवृत्त करत आहे. त्यामुळे काही देश नागरिकांना जागरूक करण्यासाठी आकर्षक ऑफर्स देखील देत आहे. नुकतेच ऑस्ट्रेलिया देशातून एक प्रकरण समोर आले आहे. जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल हे नक्की…

अन् लागली एक मिलियन डॉलरची लॉटरी

ऑस्ट्रेलियात एका तरूणीने कोरोना लस घेतल्याने तिचं नशीबच बदलल्याची चर्चा होताना दिसतेय. नुसतीच चर्चाच नाही तर जिथे लस घेतल्याने एका तरूणीचे नशीब बदलले आहे. तरूणीने कोरोनाची लस घेतल्याने ती चक्क करोडपती झाली आहे. द ऑस्ट्रेलियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ऑस्ट्रेलियात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘द मिलियन डॉलर वॅक्स कॅम्पेन’ सुरू आहे. या कॅम्पेनमध्ये जोआन झू नावाच्या तरूणीला एक मिलियन डॉलरची लॉटरी लागली आहे. म्हणजेच भारतीय चलनातील साधारण किंमत ७.४ कोटी रूपये इतकी आहे. सरकारने केलेल्या आवाहनासह विनंतीवरून कोरोनाची लस जोआनने घेतली आणि लाखो ऑस्ट्रेलियन नागरिकांपैकी जोआन ही तरूणी लकी ड्रॉ मध्ये करोडपती झाली आहे.

(हेही वाचा- आपले नाव मतदार यादीत आहे का? ‘किऑस्क’वर जाऊन पहा)

३० लाख नागरिकांपैकी जोआन ठरली भाग्यलान

मिळालेल्या माहितीनुसार, या कॅम्पेनमध्ये जोआनसह साधारण ३० लाख नागरिक सहभागी झाले होते. मात्र कोरोना लस घेण्यापूर्वी जोआनला अजिबात माहित नव्हते की ती दुसऱ्या दिवशी उठेल तेव्हा करोडपती झाली असेल. ही लॉटरी देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तिला फोन केला तेव्हा जोआन बोलू शकली नाही. मात्र नंतर तिचं संभाषण झाले त्यानंतर तिला यावर विश्वासच बसला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.