सध्या जपानी ॲनिमेशन शैलीच्या ‘घिबली’ (Ghibli) तील ‘एआय’ चे सर्व वयोगटातील लोकांना वेड लागले आहे. ओपन-एआय चॅटजीपीटीच्या नवीन अपडेटद्वारे वापरकर्ते त्यांची छायाचित्रे घिबलीद्वारे कॉर्टूनमध्ये कॉन्व्हर्ट करून सोशल मिडीयातील विविध व्यासपीठावरून पोस्ट करत आहेत. यामुळे घिबली (Ghibli) च्या चित्रांचा महापूर आला आहे.
जपानमधील ‘स्टुडिओ घिबली’ (Ghibli) हा सर्वांत प्रतिष्ठित ॲनिमेशन स्टुडीओंपैकी एक आहे. ‘स्टुडिओ घिबली’ने जगभरातील प्रेक्षकांना ‘माय नेबर तोतोरो’, ‘स्पिरीटेड अवे’, ‘पोर्को रोसो’ आणि ऑस्कर विजेता ‘द बॉय अँड द हेरॉन’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करून आपल्यामध्ये गुंतवून ठेवले आहे. आता हीच जादू ‘एआय’च्या मदतीने घिबली (Ghibli) जगभरातील कोट्यवधी लोकांना आकर्षित करत आहे.
(हेही वाचा Hindu Rashtra च्या स्थापनेसाठी देशभरात २० हजारांहून अधिक भाविकांकडून ‘सामूहिक हनुमान चालीसा पठण’ !)
या फीचरशी परिचय झाल्यानंतर, यूजरनी आपल्या कल्पनाशक्तीला वाट मोकळी करून देत, आपल्या आठवणींना ‘घिबली’ शैलीत पुन्हा जिवंत करायला सुरुवात केली. काहींनी बालपणीचे क्षण, तर काहींनी आपल्या लग्नातील आठवणी या स्वप्नवत दुनियेत गुंफल्या. भारतीय यूजरनी याला एक वेगळाच ‘ट्विस्ट’ देत बॉलिवूडच्या काही अविस्मरणीय दृश्यांनाही ‘घिबली आर्ट’च्या (Ghibli) माध्यमातून जिवंत केले आहे.
कसे वापराल हे फिचर?
चॅटजीपीटी प्रो यूजर त्यांच्या चॅट इंटरफेसमध्ये टेक्स्ट किंवा फोटो अपलोड करून काही क्षणांतच घिबली शैलीतील छायाचित्रे मिळवता येतात. ‘एआय’द्वारे त्याचे रूपांतर जपानी ॲनिमेशनच्या क्लासिक घटकांत रूपांतरित केले जाते. त्यामुळे आठवणी या कलाकृतीचे रूप घेतात.
Join Our WhatsApp Community