जे शिवसेनेत सुरु आहे, तेच कॉंग्रेसमध्ये सुरु आहे. दोन्ही पक्षातील नेते नेतृत्वाला कंटाळले आहेत. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंनी जे धाडस दाखवलं तसं धाडस दाखवण्याची छाती काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यामध्ये नाही हे दुर्दैवाने म्हणावं लागत आहे.
( हेही वाचा : हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे उभारणारा हा ठरला जगातील पहिला देश!)
कॉंग्रेस पक्ष एका परिवाराकडे झुकला गेला आहे. काहींच्या नावात जरी गुलाम असलं तरी कॉंग्रेसच्या इतर नेत्यांची अवस्था काय वेगळी नाही. कॉंग्रेसमधील गुलामीला दीर्घ परंपरा प्राप्त झाली आहे. नेहरूंनी कॉंग्रेस पक्ष काबीज केला. मधल्या काळात काही उठाव झाले असतील पण इंदिरा गांधींनी पुन्हा हा पक्ष कुटुंबाकडे नेला.
आता कॉंग्रेसचे जुने सहकारी गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. “राजीनामा देण्याआधी सहा दिवस झोपलो नाही. या पक्षासाठी आम्ही रक्त सांडलं आहे. काँग्रेस पक्षात सध्या अकार्यक्षम लोक आहेत. काँग्रेसमधील प्रवक्त्यांना आमच्या विषयी माहित नसणं, अत्यंत वेदनादायी आहे” अशी बोचरी टिका आझाद यांनी केली आहे.
“राजीव गांधींचा पुत्र म्हणून राहुल यांचाही मी आदर करतो. त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, अशी मी प्रार्थना करतो. त्यांना एक यशस्वी नेता बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण त्यात त्यांनाच रस नव्हता” असंही गुलाम नबी आझाद म्हणाले आहेत. राहुल गांधी यांना यशस्वी नेता होण्यात रस नव्हता हे वाक्य खूप महत्वाचं आहे.
राहुल गांधी हे राजकारणात आहेत ते केवळ त्यांच्या आईच्या सांगण्यावरुन आणि कॉंग्रेसची मालमत्ता आपल्या कुटुंबाकडे राहावी म्हणून. जर कॉंग्रेसची दोर त्यांच्या हातातून सुटली तर कॉंग्रेस पक्षाची मालमत्ता त्यांच्या हातातून निघून जाईल अशी भिती तर राहुल गांधी यांना वाटत नाही ना? कारण यशस्वी होण्यात रस नसताना देखील राहुल गांधी अध्यक्ष होते.
आता गुलाम नबी आझाद यांच्या म्हण्यानुसार सानिया गांधी अध्यक्ष असल्या तरी राहुल गांधीच निर्णय घेतात, इतकच काय तर त्यांचे पीए आणि बॉडीगार्ड निर्णय घेतात. हेच तर शिवसेनेत घडत होतं. जिथे सत्ता एका कुटुंबाभोवती फिरत राहते, तिथे अशीच अवस्था होते. त्यामुळे ‘गुलाम’ नबी आझाद यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते खर्या अर्थाने आझाद झाले आहेत. आता पहायचे आहे की कॉंग्रेसमध्ये कुणी एकनाथ शिंदे आहे की नाही?
Join Our WhatsApp Community