गुढीपाडव्याच्या शुभ दिनी भारतातील सर्व मातृभाषांचा जागर करत आणि अभिजात मराठीचा गौरव करत गिरगावकरांनी मोठ्या हर्षोल्हासात नववर्षाचे स्वागत केले. दि. ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता फडके श्री गणपती मंदिराजवळ महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि बेडेकर उद्योग समूहाचे संचालक वसंतराव बेडेकर यांनी गुढीपूजन केले. (Girgaon)
( हेही वाचा : protein in 100 gm paneer : १०० ग्रॅम एवढ्या पनीरमध्ये किती प्रथिने असतात? योग्य पद्धतीने पनीर कसे खावे?)

भक्ती-शक्ती संगम आणि अभिजात मराठीचा ऐतिहासिक वारसा यावरील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचा (Swami Vivekanand Yuva Pratishthan) रथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. ‘मातृभाषेला घालू साद, माय मराठी अभिजात’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ६१ मंडळ-संस्थांचा सहभाग यावर्षी यात्रेत होता. प्रसिद्ध मूर्तिकार प्रदीप मादुसकर यांच्या वैभव संपन्न गणेशासमोर महिला व युवतींनी अथर्वशीर्षाचे पठण केले. श्री स्वामी समर्थ भक्त संप्रदायातर्फे स्वामी समर्थ पालखी रथ व अखंड नामस्मरण सोहळा यात्रेच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला. पारंपारिक वेशातील 200 दुचाकीस्वार महिलांचे आदिशक्ती पथक आणि तेवढ्याच युवकांचे युवाशक्ती पथक यात्रेचे नेतृत्व करत होते. विंटेज दुचाकी पथक, सायकल स्वार तसेच स्केटिंगचे पथक पारंपरिक वेशात यात्रेत सहभागी झाले होते. (Girgaon)
प्रसिद्ध कलादिग्दर्शक तुषार कोळी यांच्या सहयोगाने ‘अभिमान मराठी, माय मराठी’ यावरील थ्रीडी देखावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त संघ कार्य आणि विस्तार यावरील देखावा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक खात्याचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित देखावा यात्रेची शान वाढवत होता. मुंबईतील (Mumbai) पहिल्या गिरगाव ध्वज पथकाच्या “नृसिंह” या नावीन्यपूर्ण नाट्याविष्कारामध्ये ढोल, ताशा, झांज, पारंपरिक वाद्य आणि ट्रॅशकॅन्स यांचा वापर करून उपस्थितांची मने जिंकली. (Girgaon)
गिरगावातील गजर ढोल पथकाने नादमय जयघोष केला. मोरया, आम्ही मावळे, साईस्वर ही महाराष्ट्रातील नावाजलेली ढोल ताशा पथके सुद्धा यात्रेत सहभागी झाली होती. गौरव नारकर यांच्या गिरगाव कलामंचची संस्कार भारती रांगोळी आणि प्रसाद मुंडे यांच्या रंगशारदा तर्फे यात्रा मार्गावरील रांगोळीच्या पायघड्यांच्या माध्यमातून गिरगावचा पाडवा रंगमय झाला. समर्थ व्यायाम मंदिर तर्फे मल्लखांब आणि रोप मल्लखांब यांची प्रात्यक्षिके वैशिष्ट्यपूर्ण ठरली त्याचप्रमाणे दिवंगत यशवंत वस्ताद आखाडा – वेतोशी, श्री शिवाजी महाराज मर्दानी आखाडा – पुणे, सह्याद्री मर्दानी दांडपट्टा प्रतिष्ठान – सातारा यांनी यात्रेदरम्यान प्राचीन युद्ध कलेची प्रात्यक्षिके सादर केली. मूर्तिकार गितेश पवार आणि गौरव पवार यांनी साकारलेली ज्ञानोबा माऊलींची वीस फूट उंच पर्यावरण स्नेही मूर्ती यात्रेत आकर्षणाचा बिंदू ठरली. (Girgaon)
कापरेश्वर मार्ग मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Swatantryaveer Savarkar) मराठी भाषेला दिलेले ४५ शब्द, संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय अश्या वैविध्यपूर्ण चित्ररथांचे सादरीकरण करण्यात आले. कळझोंडी ग्रामस्थ मंडळातर्फे पारंपरिक नमन, शेणवेवाडी मंडळाचा लहानग्यांना एकत्रित करून केलेला देखावा, नितेश मिस्त्री यांचा एक इंच गणपती, राजे प्रतिष्ठान यांचा संभाजी महाराज यांच्या पराक्रमावरचा देखावा, जीएसटी सेवा मंडळाचा गणपती आणि प्रसाद वाटप, सारथी फाउंडेशन तर्फे संत ज्ञानेश्वर आणि पसायदान यावरील देखावा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त केलेला देखावा, जीवन विद्या मिशन यांच्यातर्फे महाराष्ट्रातील मराठीच्या विविध बोलींवरील देखावा, सर्व भाषांची जननी संस्कृत यावरील संस्कृत भारती, रायरी काळोखे हिचा विद्येची देवता सरस्वती यावरील देखावा, हेरंब क्रिएशन्स यांची जुन्या मराठी गाण्यांवरील मैफल, ईशा फाउंडेशन (Isha Foundation) योग साधनेचे महत्त्व उद्धृत करणारा देखावा, श्री मागीन माता चामुंडा गुरुकृपा वीरभाई महिला गच्च बचत गट तर्फे विविध भारतीय भाषातील बाराखडी यावरील देखावा यात्रेत सहभागी झाला होता.

चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल ची मुले आणि शिक्षक त्यांनी केलेल्या गाण्यांच्या विक्रमाच्या देखाव्यासहित यात्रेत सहभागी झाले होते. गिरगाव चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, खेतवाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भव्य देखाव्यांसहित, अखिल खोताचीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव व गोकुळाष्टमी मंडळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि नाना शंकर शेठ यांचे स्मृती जागवणारे चित्ररथ घेऊन यात्रेत पहिल्यांदा सहभागी झाले होते. यात्रेत फ्लॅश ऑफ अर्थात नृत्यार्पणाचा अविष्कार गिरगावकरांना बघायला मिळाला. ठाकूरद्वार येथे साडेअकरा वाजता झालेल्या संकल्प सभेत महाराष्ट्रातील तीन पद्मश्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ, कलानिधी पद्मश्री वासुदेव कामत, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी मातृभाषेतून व्यवहार व्हावा आणि मातृभाषेचा ज्ञानभाषा म्हणून वापर व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
यात्रेच्या शेवटी यात्रेदरम्यान होणारा कचरा स्वच्छ करणारे महानगरपालिकेचे संत गाडगेबाबा स्वच्छता पथक होते. यात्रेचा समारोप श्री सिद्धिविनायक दर्शन सोहळा व महाआरतीने प्रिन्सेस स्ट्रीट येथे झाला. यात्रेचे नेतृत्व स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीधर आगरकर सचिव स्वप्नील गुरव यात्रा प्रमुख मनीष वडके आणि नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष चंद्रगुप्त खेडे यांनी केले. प्रतिष्ठित मान्यवरांसोबतच मुंबई महाराष्ट्रभरातून जवळजवळ एक लाख लोक महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक सोहळा अर्थात गिरगावचा पाडवा साजरा करायला आणि अनुभवायला गिरगावात आले होते.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community