गिरीश कर्नाड (Girish Karnad) हे भारतीय अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक, कन्नड लेखक, नाटककार होते, त्यांनी प्रामुख्याने कन्नड, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले. १९६० मध्ये नाटककार म्हणून त्यांचा उदय कन्नडमध्ये आधुनिक भारतीय नाट्यलेखनाच्या युगात आला. त्यांना १९९८ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या लेखनाची शैली म्हणजे समकालीन समस्या हाताळण्यासाठी ऐतिहासिक आणि पौराणिक कथांचा आधार घ्यायचे. त्यांनी त्यांची नाटके इंग्रजीत अनुवादित केली आणि त्यांना भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यांची काही नाटके इतर भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाली आहेत. गिरीश कर्नाड (Girish Karnad) यांचा जन्म माथेरान येथील चित्रपूर येथे १९ मे १९३८ रोजी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांची आई कृष्णाबाई ह्या विधवा होत्या.
(हेही वाचा – अजित पवारांची ‘ती’ ओरड निरर्थक, Sharad pawar यांचा दावा)
उदरनिर्हासाठी त्यांच्या आईने बॉम्बे मेडिकल सर्व्हिसेसमधील डॉक्टर रघुनाथ कर्नाड यांच्या अंथरुणाला खिळलेल्या पत्नीसाठी परिचारिका आणि स्वयंपाकी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सुमारे पाच वर्षांनंतर, आणि पहिली पत्नी जिवंत असताना, कृष्णाबाई (गिरीश कर्नाड यांची आई) आणि रघुनाथ कर्नाड यांनी विवाह केला. कर्नाड यांचे प्राथमिक शालेय शिक्षण मराठीत झाले. पुढे, त्यांच्या वडिलांची बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या कन्नड भाषिक प्रदेशातील सिरसी येथे बदली झाल्यानंतर, कर्नाड यांचा नाट्यसमूह आणि नाटक मंडळी यांच्याशी संपर्क झाला.
सुरुवातीला त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, चेन्नई येथे सात वर्षे काम केले. पुढे ते पूर्णवेळ लेखक झाले. चेन्नई येथे ते स्थानिक हौशी थिएटर ग्रुप, द मद्रास प्लेअर्समध्ये सामील झाले. पुढे कर्नाड यांची कारकीर्द आभाळाला जाऊन पोहोचली. नाट्यक्षेत्रात त्यांनी प्रचंड नाव कमावले. मग मालिका, सिनेमामध्ये ते उत्कृष्ट कलाकार म्हणून समोर आले. हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून काम केले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मुंबईत चोख बंदोबस्तात मतदान, ४० हजार पोलिसांचा फौजफाटा मतदानाच्या दिवशी तैनात)
त्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी चार फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत, त्यापैकी तीन फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – कन्नड आणि चौथा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून मिळाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community