गिरीष महाजनांचे खंडणी आणि रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण CBI कडे वर्ग?

महाराष्ट्रात सत्तांतर होताच शिंदे- फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे अनेक निर्णय रद्द केले आणि नव्या सरकारने महत्त्वाच्या प्रकरणाचे तपासही महाराष्ट्र पोलिसांच्या हातून काढून सीबीआयकडे वर्ग करण्याची तयारी केली आहे. भाजप नेते गिरिष महाजन यांच्यासह इतर 2 जणांविरोधात दाखल झालेला खंडणीचा गुन्हा तसेच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना अडचणीत आणणारा फोन टॅपिंग अहवाल लीक प्रकरणाशी संबंधित गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात बिकेसी सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आणि गिरीश महाजन यांच्यावर दाखल असलेला कोथरूडमधील गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

( हेही वाचा: शिक्षण भरती घोटाळा प्रकरणात छापेमारी; 20 करोड रुपयांची रोकड ईडीकडून जप्त )

दोन्ही गुन्हे सीबीआयकडे वर्ग 

फोन टॅपिंग अहवाल लिक प्रकरणात सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. हे दोन्ही महत्वाचे गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्याचे निर्देश राज्य सरकारने पोलिसांना दिले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बनवलेला अहवाल लिक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तर पुण्याच्या कोथरूडमध्ये भाजप नेते गिरीश महाजन आणि काही जणांवर अपहरण आणि खंडणी यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यात मोक्का लावून महाजन यांना अडकवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी अधिवेशनात केला होता. आता हे दोन्ही गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्याचे निर्देश राज्य सरकारने पोलिसांना दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here