अहमदाबादमध्ये इमारतीच्या आगीत मुलीचा होरपळून मृत्यू; तर अनेक लोक अडकले

गुजरातच्या अहमदाबाद शहरातील शाहीबाग परिसरात एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर आज, शनिवारी भीषण आग लागली. या अपघातात एका मुलीचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक लोक अडकले आहेत. यादरम्यान अनेक लोक जीव वाचवण्याची आतून मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले.

 काही लोक अडकले आगीत 

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घरातील इतर सदस्य घरी उपस्थित नव्हते. आग कशामुळे लागली हे देखील स्पष्ट झालेले नाही. काही लोक वरच्या मजल्यावर अडकले आहेत. दरम्यान, या भीषण आगीचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सातव्या मजल्यावरील गॅलरीत एक व्यक्ती आगीत अडकलेले दिसत आहे.

( हेही वाचा: सूर्यावर मोठा स्फोट; पृथ्वीला ताप? )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here