AI Chatbot ChatGPT आणि BARD नंतर आता एआय चॅटबॉट तंत्रज्ञान शर्यतीत उतरले आहे. Google च्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने गीता GPT विकसित केले आहे. हे जीपीटी भगवद्गीतेपासून प्रेरित आहे. गीता चॅटबॉटच्या मदतीने, वापरकर्ते त्यांच्या दैनंदिन समस्यांबाबत “भगवतगीतेचा सल्ला” घेऊ शकतील. म्हणजेच, या गीता GPT प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते जे काही प्रश्न विचारतील, त्याचे उत्तर AI चॅटबॉट भगवद्गीतेचा सल्ला घेऊन देणार आहे.
बेंगळुरूस्थित Google सॉफ्टवेअर अभियंता सुकुरु साई विनीत यांनी हे गीता जीपीटी विकसित केलं आहे. जे भगवद्गीतेपासून प्रेरित आहे.
( हेही वाचा: ‘गोमंतक मय ब्राह्मण समाज’ संस्थेचा सुवर्ण महोत्सव सोहळा रविवारी विलेपार्ले दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात )
कसे काम करेल हे गीता GPT
या चॅटबाॅटवर जाऊन दैनंदिन समस्यांबाबत प्रश्न विचारल्यास हे तंत्रज्ञान तुम्हाला भगवत् गीतेचा आधार घेत प्रश्नांची उत्तरे देते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट GPT-3 द्वारे हे गीता GPT नियंत्रित केले जाते. तुमच्या जीवनातील समस्यांना थेट भगवद्गीतेमधून उत्तर दिले जाणार आहे. केवळ मोठ्या टेक कंपन्याच नाही तर स्टार्ट-अप आणि डेव्हलपरदेखील या तंत्रज्ञानावर काम करत आहेत आणि AI चॅटबॉट्स विकसित करण्याचा विचार करत आहेत.
चॅटबॉट समस्यांवर उपायही सांगतो
OpenAI च्या GPT-3 द्वारे या गीता GPT ला नियंत्रित केले जाते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गीता GPT च्या मदतीच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील निर्णयांमध्ये सहज, संवादात्मक मार्गाने अंतर्दृष्टी आणि स्पष्टता मिळवू शकता. चॅटबॉट जीवनातील बहुतेक समस्यांची उत्तरे देते आणि त्या कशा सोडवता येतील हे देखील सांगते.
Join Our WhatsApp Community