‘व्हॅलेंटाइन डे’चा ट्रेंड भारतात नक्की कधीपासून सुरु झाला?

297

रोमचा व्हॅलेंटाइन हा रोममधील एक पुजारी होता जो इसवी सन २६९ मध्ये मरण पावला होता आणि त्याला फ्लेमिनियामध्ये दफन करण्यात आले होते. इसवी सन ४९६ मध्ये पोप गेलासियस प्रथम यांनी हा दिवस संतांच्या दैनंदिनीमध्ये जोडला होता. यालाच व्हॅलेंटाइन डे, सेंट व्हॅलेंटाइन डे किंवा सेंट व्हॅलेंटाइनचा उत्सव देखील म्हणतात. भारतात १९९२ आधी व्हॅलेंटाईन डे अस्तित्वात नव्हता.

दशकभरापूर्वी ‘व्हॅलेंटाइन डे’ने भारतात छाप पाडण्यास सुरुवात केली. त्याआधी भारतात क्वचितच व्हॅलेंटाइन डे साजरा केला असेल. सध्या व्हॅलेंटाइन डे शहरी तरुणांसह ग्रामीण भागांमध्ये लोकप्रिय आहे. परंतु आर्थिक जागतिकीकरणानंतर नवश्रीमंत वर्गाच्या उदयामुळे फॅन्सी डिनर आणि डान्स क्लब, महागडे कार्ड्स यामुळे देशभरात व्हॅलेंटाइन डे विषयीची उत्सुकता वाढीस लागली. प्रारंभी बजरंग दल, शिवसेना या पक्षांनी व्हॅलेंटाईन डे या पाश्चात्य संस्कृतीला जोरदार विरोध झाला.

( हेही वाचा : राजपथावरील पथसंचलनात का ठरतोय ‘महाराष्ट्र’ अव्वल? )

भारतातील व्हॅलेंटाईन डे 

१९९१-९२ नंतर भारतीय संस्कृतीत जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात बदल झाला. या दरम्यान, व्यवसायिक टीव्ही चॅनेलने खास व्हॅलेंटाइन शोची निर्मिती केली. प्रेम विषयक रेडिओ कार्यक्रम आणि अगदी प्रेमपत्र स्पर्धाही आयोजित केल्या गेल्या. १९९२, १९९३ च्या भारतीय वृत्तपत्रात व्हॅलेंटाइन डेचा विशेष उल्लेख आढळत नाही, परंतु २१ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच वृत्तपत्रांमधून व्हॅलेंटाइन डे साठी विशेष लेख लिहित सामान्यांना आकर्षित केले गेले. याअंतर्गत बऱ्याच वृत्तपत्रांनी तुमची लव्हस्टोरी आम्हाला लिहून कळवा, असे नवे ट्रेंड सुरु केले.

propsal

१९९१ मध्ये भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली, त्यानंतर भारतात प्रामुख्याने मल्टी नॅशनल कंपन्यांचे (MNC) साम्राज्य वाढले. तर दिल्लीत कमला नगरमध्ये भारतातील पहिले आर्चिस स्टोअर १९८७ मध्ये सुरु करण्यात आले. या दोन गोष्टींमुळे व्हॅलेंटाइन डे हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. १९९२ पर्यंत भारतात व्हॅलेंटाइन डे साजरे केले जात नव्हते. व्यावसायिक टीव्ही वाहिन्यांवरील कार्यक्रमांमुळे ते पसरले गेले. जसे की, एमटीव्ही MTV चॅनेल वरील प्रेमविषयक रिअॅलिटी शो, रेडिओ कार्यक्रम आणि प्रेमपत्र स्पर्धा यामुळे भारतामध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा होऊ लागला.

बॉलिवूड व्हॅलेंटाइनच्या प्रेमात

मल्टी नॅशनल कंपन्यांचा ट्रेंड आणि आर्चिसच्या दुकानांमधील आकर्षक भेटवस्तू यांची भुरळ बॉलिवूडला पडली आणि परिणामी व्हॅलेंटाइन डे निमित्त मुलींना इंम्प्रेस करणे, चित्रपटांमध्ये रंगवल्या जाणाऱ्या आलिशान व्हॅलेंटाइनच्या पार्ट्या यामुळे हा व्हॅलेंटाइन डे प्रचलित झाला. अनेक सामान्य तरुणांनी चित्रपटातील अभिनेत्यांचे अनुकरण करत, खऱ्या आयुष्यात प्रेयसीला इंम्प्रेस केले.

सोशल मिडियाची साथ

फेसबुक, ट्वीटर, इन्टाग्राम या अॅपमुळे प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ, विविध दैनंदिन अपडेट समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्याचा ट्रेंड सुरु झाला आणि कालातरांने सोशल मिडियामुळे पाश्चात्य संस्कृतीला अधिक महत्व प्राप्त होऊ लागले. सोशल मिडियामुळेच व्हॅलेंटाइन डेला गरजेपेक्षा जास्त महत्व मिळाले. पूर्वी केवळ व्हॅलेंटाइन डे अस्तित्वात होता. परंतु आर्चिस स्टोअर, बॉलिवूडचे चित्रपट आणि सोशल मिडियाचे ट्रेंड यामुळे एका दिवसाच्या डेचे रुपांतर, व्हॅलेंटाइन वीकमध्ये झाले.

व्हॅलेंटाइन डे आणि आर्थिक समीकरण

व्हॅलेंटाइन डे निमित्त बाजारपेठांमध्ये विकण्यासाठी नवनवीन शोभिवंत वस्तू येतात. मुंबईतील अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी व्हॅलेंटाइनचा संपूर्ण वीक साजरा केला जातो. खास व्हॅलेंटाइन डे म्हणून रंगीबेरंगी गुलाब, टेडी बिअर, ग्रिटींग कार्ड्स, चॉकलेट, लाल रंगाच्या विविध वस्तू अगदी सहज विकल्या जातात. त्यामुळे व्हॅलेंटाइन डे आणि आर्थिक समीकरण दिवसेंदिवस बदलत चालले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.