ग्लोबल गुरुजी डिसले सर झाले जागतिक बॅंकेचे सल्लागार!

88

शिक्षक… मुलांच्या आयुष्याला एक वेगळं वळण आणि दिशा देणारं व्यक्तिमत्त्व. पण शाळेतले शिक्षक फक्त इतिहास शिकवू शकतात, घडवू शकतात का? याचं उत्तर आहे हो… महाराष्ट्राच्या मातीतच इतिहास घडवण्याची परंपरा आहे. असाच महाराष्ट्राचा अभिमान असलेले रणजित सिंह डिसले गुरुजी यांनीही इतिहासात नोंद होईल अशी कामगिरी केली आहे. ग्लोबल टीचरचा पुरस्कार मिळवून जगप्रसिद्ध झालेल्या डिसले गुरुजींनी आता पुन्हा एकदा जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली आहे. जागतिक बँकेतर्फे निवडण्यात आलेल्या सल्लागारांमध्ये डिसले गुरुजी यांची निवड झाली असून ते भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहेत.

भारताचं करणार प्रतिनिधित्त्व

जागतिक बॅंकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजित सिंह डिसले यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जगभरातून जागतिक बँकेद्वारे एकूण 12 सल्लागारांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी रणजीत सिंह डिसले गुरुजी भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहेत. डिसंबर 2024 पर्यंत डिसले सर सल्लागार म्हणून काम करतील.

देशाची मान उंचावली- उपमुख्यमंत्री

‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्राचे सुपुत्र रणजित सिंह डिसले यांची जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागार पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. डिसले गुरुजींच्या ह्या दैदीप्यमान यशानं देशाची मान उंचावली आहे. त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

शिक्षणमंत्र्यांनी केले अभिनंदन

डिसले गुरुजींना मिळालेल्या या यशाबद्दल राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांना मिळालेला हा मान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.