Go First एअरची ‘फ्रीडम ऑफर’ सुरू! Free सीट सिलेक्शनसह मिळतायत ‘या’ सुविधा विनामूल्य

89

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बजेट एअरलाइन कंपनी Go First ने एक खास ऑफर सुरू केली आहे. कंपनीने त्याला फ्रीडम ऑफर असे नाव दिले आहे. एअरलाइन कंपनीच्या मते, जे या ऑफर अंतर्गत तिकीट बुक करतील त्यांना फ्री सीट सिलेक्शनसह मोफत जेवणाचा लाभ मिळणार आहे.

काय आहे फ्रीडम ऑफर

गो फर्स्ट या मुंबईस्थित विमान कंपनीने ट्वीटरवरून फ्रीडम ऑफरबाबत माहिती दिली आहे. या खास ऑफर अंतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशाला हवे असल्यास त्याच्या आवडीची सीट निवडता येणार आहे, ज्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. या ऑफरमध्ये प्रवाशांना प्रवासादरम्यान मोफत जेवणही दिले जाणार आहे. फ्रीडम ऑफर अंतर्गत 30 ऑगस्ट 2022 पर्यंत तिकीट बुक करता येणार आहे. बूक केलेल्या तिकिटाद्वारे 25 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत प्रवास करता येणार आहे. तसेच जे प्रवासी मुंबई, अहमदाबाद आणि पुण्याला जाणार आहेत, त्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

गो फर्स्ट एअरलाइनला ‘लो कॉस्ट कॅरियर’ मानले जाते, कारण या एअरलाइन्सद्वारे प्रवासी कमी दरात तिकीटं बूक करून प्रवास करू शकतात. गेल्या महिन्यात या विमान कंपनीने विशेष मान्सून स्पेशल ऑफर जाहीर केली होती. ही ऑफर 31 मार्च 2023 पर्यंत वैध असून त्यानुसार देशांतर्गत प्रवासासाठी तिकीटाची किंमत 1499 रूपयांपासून सुरू झाली होती. ही ऑफर 7 जुलै ते 10 पर्यंत होती. व त्या काळात बूक करण्यात आलेल्या तिकीटावर 26 जुलै 2022 ते 31 मार्च 2022 पर्यंत प्रवास करता येणार आहे. तर फर्स्ट कम फर्स्ट गेट या तत्त्वावर प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून लोकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

(हेही वाचा – PMLA कायद्यातील तरतुदींवर शिक्कामोर्तब; ED चे अधिकार कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)

दरम्यान, गो फर्स्ट एअरलाइन कंपनीतर्फे कपल्ससाठी 1000 रुपयांचे फ्री फूड हॅम्पर आणि कुटुंबासाठी 2000 रुपयांचे फ्री फूड हॅम्पर मिळते. 25 सप्टेंबर 2022 पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो. हा बुकिंग कालावधी असून प्रवासाचा कालावधी 7 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2022 पर्यंत असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.