टेकऑफ करताना दिल्लीत Indigo फ्लाईटखाली आली कार, बघा Video

दिल्ली विमानतळावर मंगळवारी एक मोठी दुर्घटना होता, होता टळली आहे. दिल्ली विमानतळावर एक कार थेट इंडिगो विमानाच्या खाली येऊन थांबली. सुदैवाने विमानाचे चाक आणि कारची धडक झाली नाही. परंतु या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

(हेही वाचा – अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर भारतात गुप्तचर खात्याकडून हाय अलर्ट! भारतात हल्ल्याची शक्यता)

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार गो फर्स्ट एअर लाईन्सची होती. ही घटना दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल T2 च्या स्टँड क्रमांक 201 वर झाली. या ठिकाणी गो फर्स्ट एअरलाइन्सची कार इंडिगोच्या A320neo या फ्लाइटच्या चाकाजवळ आली. या घटनेमुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली.

बघा व्हिडिओ

या घटनेत कोणताही जीवितहानी झालेली नाही. मात्र नागरी वाहतूक महासंचालनालय या घटनेची चौकशी करणार आहे. या घटनेनंतर कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याने मद्य प्राशन केले आहे का हे जाणून घेण्यासाठी त्याची तपासणी करण्यात आली. परंतु गाडी चालवत त्याने कोणतेही मद्यप्राशन केलेले नव्हते, हे या चाचणीतून समोर आले आहे. इंडिगो एअरलाईन्सचे हे विमान दिल्लीतून पटणा या शहराकडे उड्डाण घेणार होते मात्र त्यापूर्वीच ही घटना घडली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here